शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सदोष नोंदणीमुळे हजारो कामगार लाभापासून वंचित

By admin | Updated: May 29, 2014 01:12 IST

व्यापक सर्व्हे गरजेचा : जिल्ह्यात २६,७०० बांधकाम कामगारांची नोंद

भारत चव्हाण ल्ल कोल्हापूर जिल्ह्यातील बांधकाम व्यवसायात काम करणार्‍या कामगारांची नोंदणी सदोष पद्धतीने झाली असल्याने राज्य सरकारच्या कामगार मंत्रालयातर्फे देण्यात येणार्‍या विविध योजनांपासून हजारो कामगारांना वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. याबाबत तक्रारी केल्यानंतरही त्याची दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे व्यापक प्रमाणात सर्व्हे होऊन जोपर्यंत नोंदणी केली जाणार नाही तोपर्यंत कामगारांसाठी चांगल्या योजना असूनही लाभार्थी नसतील अशी परिस्थिती राहील. राज्यातील बांधकाम कामगारांच्या हितासाठी राज्य सरकारने महाराष्टÑ इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळामार्फत कामगारांच्या कल्याणासाठी शिक्षण, विमा, सुरक्षाविषयक विविध योजना राबविण्यात येत आहेत. कामगार मंडळाकडे सध्या १९८९ कोटी रुपयांचा निधी उपकराच्या रूपाने जमा झाला असून त्यातूनच या योजनांची अंमलबजावणी होणार आहे. राज्यात १ लाख ७८ हजार ५१६ बांधकाम कामगारांची नोंदणी झाली असून त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील २६ हजार ७०० कामगारांचा समावेश आहे. परंतु नोंदणीची पद्धत चुकीची असल्याने नोंदणी सदोष झाली असल्याची तक्रार केली जात आहे. मुळात बांधकाम कामगार हे कमी शिकलेले,अडाणी असतात. त्यामुळे नोंदणी कशी करायची असते, कोठे करायची असते आणि त्याबाबतचे निकष काय आहेत हे त्यांना कळत नाही. त्यामुळेच जिल्ह्यातून नोंदणी कमी झाल्याच्या तक्रारी होत आहेत. बांधकाम कामगारांसाठी काम करणार्‍या काही संघटना जिल्ह्यात आहेत. परंतु त्यांना कोणत्या योजना राबविल्या जात आहेत. नोंदणी कशी केली आहे यासंदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती सरकारी यंत्रणेद्वारे देण्यात येत नाही, अशीही तक्रार आहे.