शहरं
Join us  
Trending Stories
1
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
2
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
3
Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?
4
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
5
कष्टाचं फळ मिळालंच! स्मृती मानधनानं दुसऱ्यांदा जिंकला आयसीसीचा स्पेशल अवॉर्ड
6
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
7
बाजारात तेजीचा डबल धमाका! सेन्सेक्सची ८६२ अंकांची उडी; गुंतवणूकदारांनी कमावले २.०९ लाख कोटी
8
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
9
आशिया कप स्पर्धेत कार जिंकली; आता स्फोटक बॅटर अभिषेक शर्माला ICC कडून मिळालं मोठं बक्षीस
10
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?
11
Diwali Rain Alert: यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडी नाही तर पाऊस बरसणार, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान असं असणार
12
कष्टाचं फळ! ५० रुपये मजुरी, घरोघरी जाऊन विकली भाजी, शिक्षण सोडलं अन् आता RAS ऑफिसर
13
Raigad Crime: पतीच्या हत्येसाठी इन्स्टाग्रामवर अकाऊंट, कृष्णाला बस स्टॅण्डवर भेटायला बोलावलं अन् बॉयफ्रेंड, मैत्रिणीच्या मदतीने काढला काटा
14
इंडिया आघाडीत राज ठाकरेंच्या मनसेला सहभागी करून घेणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले...
15
Mumbai Crime: एक व्हिडीओ कॉल अन् मुंबईतील व्यक्तीचे 58 कोटी लुटले! 'तुम्ही मनी लॉड्रिंग केलंय' म्हणत...
16
Vasubaras 2025: रमा एकादशी आणि वसुबारस (गोवत्स द्वादशी) एकत्र; कशी करावी पूजा? वाचा लाभ!
17
Happy Diwali Stickers: एक नंबर! आपल्या माणसांना द्या खास शुभेच्छा; WhatsApp वर स्वत:च 'असे' बनवा 'दिवाळी स्टिकर्स'
18
'या' शेअरने वर्षात १ लाखाचे केले १ कोटी! गेल्या दिवाळीचा लखपती यंदा कोट्यधीश, टॉप १० मल्टीबॅगर स्टॉक
19
“तक्रार करण्यासारखे काही घडले नाही, संजय राऊतांना...”; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितले
20
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?

दहा हजारांच्या वर मते तरीही गुलालाची हुलकावणी

By admin | Updated: March 2, 2017 01:19 IST

जिल्हा परिषद निवडणूक : अठराजणांच्या पदरात पराभव; बाराजणांना दिला अपक्षांनी झटका

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पराभवाची चव अनेकांनी चाखली आहे, पण दहा हजारांपेक्षा अधिक मते घेऊनही अठराजणांना गुलालाने हुलकावणी दिली. एवढेच नव्हे तर बारा हजारापेक्षा अधिक मते घेऊनही सातजणांच्या पदरात पराभव पडला आहे. दुसऱ्या बाजूला तब्बल बारा मतदारसंघात दिग्गजांना अपक्षांनी झटका दिला आहे. अध्यक्षपद खुले असल्याने नेत्यांचे डझनभर वारसदार व पहिल्या फळीतील नेते रिंगणात उतरले होते. प्रत्येक इच्छुकाकडे विजयाचे गणित असते, त्यानुसारच पत्ते टाकले जातात पण काहीवेळा सगळे पत्ते बरोबर पडतातच असे नाही, त्यामुळे एखादा अपक्षही विजयाचे गणित बिघडून टाकतो. बारा मतदारसंघातील काठावर पराभूत उमेदवार व अपक्ष यांच्या मताचा ताळमेळ घातला तर हे लक्षात येते. नेसरी मतदारसंघात शिवसेनेचे संग्राम कुपेकर यांचा १९८ मतांनी पराभव झाला. अपक्ष सुरेश पाटील यांना २१३, नारायण वार्इंगडे यांनी २०५ असे मते घेतली. माणगावमध्ये महेश पाटील यांना २४५ मतांनी पराभव झाला आणि रामचंद्र कांबळे ११७ तर संतोष पाटील यांनी ७१६ मते घेतली बोरवडे मतदारसंघात वीरेंद्र मंडलिक यांचा १७९ मतांनी पराभव झाला. साताप्पा कांबळे ७६ तर किशोरकुमार चौगले यांनी ५९ मते घेतली. आकुर्डे मतदारसंघात प्रकाश पाटील यांनी ७२१ घेतली आणि शाहू आघाडीचे मधुआप्पा देसाई यांचा २८५ मतांनी पराभूत झाले. यवलूजमध्ये दीपिका कांबळे व वैशाली भोमकर यांनी २४० मते घेतली आणि संगीता काशीद यांचा ६५ मतांनी पराभव झाला. कोतोलीत सागर सणगर, संदीप खवळे व नामदेव चौगले यांनी ६९१ मते घेतली आणि अजित नरके यांचा १८१ मतांनी पराभव झाला. हे तिघेही नरके यांच्या बालेकिल्याततील अपक्ष आहेत. शियेमध्ये रोहिणी कामत (५१७), सुरेखा (५३०) व राणी देवकुळे (४४७) म्हणजेच तीन अपक्षांनी १५९४ मते घेतली आणि सुषमा सातपुते १४३ मतांनी पराभूत झाल्या. उचगावात चंद्रकांत नागांवकर (१२८), सागर भोसले (५५), देवदत्त माने (४८५), स्वप्निल माने (३०), विजय लांडगे (१७७) या पाच जणांनी तब्बल ८७५ मते घेतली आणि सतीश भोसले यांना फटका बसला. निगवे खालसामध्ये मनीषा बोटे यांचा ३४७ मतांनी पराभव झाला. तर कविता चव्हाण (१२९) व ‘शेकाप’च्या राजश्री ढवण (५९६) मते घेतली. दत्तवाडमध्ये सुनील लगड (५२५) व विकास पाटील (२५२) यांनी ७७७ मते घेतली आणि संताजी घोरपडे ७७८ मतांनी पराभूत झाले. कौलवमध्ये अरुण पाटील यांनी २७३३, दीपक पाटील यांनी १८२२ मते घेतली आणि संजय कलिकते १४८६ मतांनी पराभूत झाले. नांदणीत चिदानंद मेंडीगीरे यांनी ४९१ मते घेतली. शेखर पाटील ६ मतांनी पराभूत झाले आहेत. (प्रतिनिधी)६८ जणांना पाचशेच्या आत मते जिल्हा परिषदेला पाचशे पेक्षा कमी मतदान पडलेले ६८ उमेदवार आहेत. सर्वाधिक करवीरमधील १७, सर्वांत कमी गडहिंग्लजमधील दोन आहेत. राधानगरी व आजरा तालुक्यात एकही उमेदवार पाचशे मतांच्या आत नाही. सर्वांत कमी म्हणजे ३७ मते प्रदीप माकणे (रेंदाळ) यांना मिळाली आहेत. दहा हजारांपेक्षा अधिक मते तरीही पराभवरणवीर गायकवाड, अक्षय पाटील, महादेव पाटील, अशोक चराटी, अमर पाटील, भीमराव साठे, समृद्धी पाटील, अजित नरके, वेदांतिका माने, महावीर गाट, वृषाली पाटील, वीरेंद्र मंडलिक, अर्चना पाटील, उज्ज्वला घाटगे, सुरेश सातपुते, मनीषा बोटे, सुजाता शिंदे, आरती तायशेटे यांचा समावेश आहे. साडेचार हजारांचा विजयीसर्वांत कमी ४५९३ मते घेऊन तिसंगीतून काँग्रेसचे भगवान पाटील विजयी झाले तर बोरवडेत तब्बल १३ हजार ४१८ मते घेऊनही वीरेंद्र मंडलिक यांना पराभव पत्करावा लागला.