शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

हजारो वकील रस्त्यावर उतरणार

By admin | Updated: October 7, 2016 01:11 IST

मराठा क्रांती मूकमोर्चा : कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या बैठकीत निर्णय

कोल्हापूर : येत्या १५ आॅक्टोबरला कोल्हापुरात होणाऱ्या मराठा क्रांती मूकमोर्चामध्ये काळा कोट या ड्रेसकोडसह हजारो वकील सहभागी होणार आहेत. या दिवशी कामकाज बंद ठेवण्यात येणार असून एकाही पक्षकाराचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. मोर्चानंतर दसरा चौकातील स्वच्छतेची जबाबदारी घेतली जाईल, असे प्रतिपादन बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश मोरे यांनी केले. जिल्हा न्यायालयातील शाहू सभागृहात गुरुवारी मराठा मूकमोर्चात सहभागाबद्दल आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. अ‍ॅड. मोरे म्हणाले, ब्रिटिशांविरोधात सन १८१८ मराठ्यांचे युद्ध झाले होते. त्यावेळी सर्व मराठा समाज एकत्रित आला होता. त्यानंतर आता मराठा समाज एकत्र येणार आहे. शांतपणे समाजबांधव एकजूट दाखवत आहे. या दिवशी ‘नो व्हेईकल डे’ असल्याने न्यायालयीन कामकाज होणार नाही. त्यामुळे सर्व पक्षकारांना न्यायालयात न येता परस्पर मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करत आहोत. या दिवशी सर्व वकील सकाळी ८.३० वाजता सीपीआरसमोरील जुन्या न्यायालयाच्या आवारात जमतील. यावेळी ते पारंपरिक काळा कोट व पांढरी पँट या ड्रेसकोडसह उपस्थित राहणार आहेत तेथून सर्वजण दसरा चौकात येऊन मोर्चात सहभागी होतील. यावेळी अ‍ॅड. अरुण पाटील, सर्जेराव खोत, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, कोमल राणे, विजयसिंह पाटील, शिवराम जोशी, व्ही. आर. पाटील, कल्पना माने, राजेंद्र किंकर, आर. आर. कडदेशमुख आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. खंडपीठाच्या मागणीची दखल घ्यासहा जिल्ह्यांसाठी कोल्हापूर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे या ठिकाणी उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी आम्ही लढा देत आहोत. ही मागणीही मराठा मूकमोर्चाच्या मागणीमध्ये समाविष्ट करावी, अशी विनंती सर्व वकील मंडळीतर्फे वसंत मुळीक यांच्याकडे केली. भविष्यकाळात सरकारी नोकरीत मराठा दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी परिस्थिती समाजबांधवांची झाली आहे, अशी खंत वसंतराव मुळीक यांनी बोलून दाखविली. खोट्या अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. या दृष्टीने काम होणे गरजेचे असल्याचे मत अ‍ॅड. कोमल राणे यांनी मांडले. बार असोसिएशनच्या कार्यालयाला कुलूप लावा. कारण मराठा समाजाला मदत करण्यासाठी इतर जाती धर्मातील लोकही सरसावले आहेत. त्यामुळे पक्षकारही येणार नाहीत. याची जाणीव ठेवून कार्यालयाला कुलूप लावा, असे मत माजी अध्यक्ष विवेक घाटगे यांनी व्यक्त केले. कोल्हापूर जिल्हा न्यायालयातील शाहू सभागृह येथे गुरुवारी मराठा मूकमोर्चात सहभागी होण्याबद्दल आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश मोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.