लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या ९ आॅगस्टच्या मराठा क्रांती महामोर्चासाठी हजारो मराठा बांधव कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि सीमाभागांतून मंगळवारीच राजधानी मुंबईत मिळेल त्या वाहनाने दाखल झाले आहेत.मराठा मोर्चासाठी कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती, खासदार संभाजीराजे छत्रपती मंगळवारी दाखल झाले. या मोर्चासाठी मंगळवारी सकाळपासूनच कोल्हापूरसह, बेळगाव, सांगली, सातारा येथील मराठा बांधव खासगी वाहनांसह एस.टी. बसेस, ट्रॅव्हल्स अशा वाहनांतून मुंबईकडे जात होते.कोल्हापूरहून आलेली वाहने वाशी येथील ए.पी.एम.सी. मार्केट येथे पार्किंगसाठी व्यवस्था करण्यात आलेल्या ठिकाणी पाठविण्यात येत होती. या ठिकाणी कोल्हापूरचे सकल मराठा समाजाचे स्वयंसेवक सहकार्य करत होते. कोल्हापुराहून दाखल झालेल्या मोर्चेकºयांचा मुक्काम आझाद मैदानावरच राहिला.
हजारो कोल्हापूरकरांचे मराठा वादळ राजधानीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 03:01 IST