शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

रविकिरणच्या त्या बारा कामगारांनी कामावर रुजू व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 17:22 IST

Labour, Gadhinglaj, PaperMill, Kolhapurnews हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू असलेल्या रवीकिरण पेपर्स मिल्स प्रा. लिमिटेड या कंपनीमधील आंदोलनात सहभागी झालेल्या बारा कामगारांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन कंपनी व्यवस्थापनाने केले आहे.

ठळक मुद्देरविकिरणच्या त्या बारा कामगारांनी कामावर रुजू व्हावेकंपनी व्यवस्थापनाचे आवाहन

चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू असलेल्या रवीकिरण पेपर्स मिल्स प्रा. लिमिटेड या कंपनीमधील आंदोलनात सहभागी झालेल्या बारा कामगारांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन कंपनी व्यवस्थापनाने केले आहे.कंपनीने नेमलेल्या सर्व कायम कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार, प्रॉव्हीडंड फंड, कामगार आरोग्य विमा योजना याचे लाभ दिले जात आहेत. कंपनीकडील ठेकेदार यांच्याकडूनही कामगारांना सर्व कायदेशीर लाभ दिले जात होते.कंपनीतील १८ कामगारांनी दिनांक ८ सप्टेंबर २०२० पासून युनिनच्या सल्याने कंपनीमध्ये बेकायदेशीरपणे संपास सुरुवात केली आहे. कंपनीतील या कामगारांनी याकरिता मागणीही केवळ कायद्याप्रमाणे जाहीर होणारे महागाई भत्ता फरकाची मागणी केलेली आहे.याबाबत कंपनीतर्फे पहिल्यापासून त्यांना कंपनीमार्फत सर्व कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार पगार देत असल्याचे सांगण्यात आले आहे.

कामगारांचा महागाई भत्ता फरक त्यातच समाविष्ट असल्याने पुन्हा नव्याने देणे कायदेशीररित्या बंधनकारक नाही, असे कळविले आहे. ह्ययुनियनह्णच्यावतीने कायदेशीर बाब न समजावून घेतली नाही.कंपनीतर्फे देण्यात येणाऱ्या भत्त्यात कायदेशीर मतभेद असल्यास न्यायालयात दाद मागावी. न्यायालयाने जर कामगारांच्या मागणीनुसार सर्व लाभ द्यावे असे सुचविलेस कंपनी देण्यात तयार आहे.

कामगारांवर जर कंपनीने अन्याय केल्यास दाद मागायला कायदेशीर मार्ग उपलब्ध असताना चुकीच्या मार्गाने व आडमुठेपाणाची भूमिका घेवून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपासारखे टोकाचे हत्यार उपसून कामगारांना व कंपनीस ८ सप्टेंबर २०२० पासून वेठीस धरले आहे.कंपनीतील संपात सध्या सहभागी असलेल्या १२ कामगारांना वारंवार आवाहन करूनही आजतागायत ते कामावर हजर झालेले नाहीत. युनियनने कायदेशीर मार्गाचा अवलंब न करता कामगारांची दिशाभूल करून जाणीवपूर्वक चुकीच्या मार्गाने आंदोलन करून कंपनीची बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही व्यवस्थापनाने सांगितले.

टॅग्स :Labourकामगारkolhapurकोल्हापूर