शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आरोपांचा महाराष्ट्र ब्राह्मण मंडळाकडून निषेध

By admin | Updated: March 26, 2015 00:10 IST

समाजात फूट पाडणाऱ्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सिंधुदुर्गनगरी : सांगली येथे झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात ब्राह्मण समाजावर केल्या गेलेल्या आरोपांचा महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिंधुदुर्गने निषेध केला आहे.याबाबतचे निवेदन सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. यामध्ये नमूद करण्यात आले आहे की, काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या सांगली येथील संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये ब्राह्मणी व्यवस्थेच्या लोकांनी नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे यांच्या हत्या घडवून आणल्या आहेत. आता तुम्हाला माफी नाही’ अशाप्रकारची वक्तव्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. मनोज आखरे यांनी करून ब्राह्मण समाजाला चिथावणी दिली आहे.अनेक सामाजिक कार्यात ब्राह्मण समाज अग्रेसर असतो. बाबा आमटे, नरेंद्र दाभोळकर, अभय बंग या सर्वांच्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे व सदैव राहणार. परंतु संभाजी ब्रिगेडसारखी काही मंडळी प्रत्येक गोष्टीचे भांडवल करून ब्राह्मण समाजावर गरळ ओकण्याचा प्रयत्न करतात व नंतर निष्फळही होतात. अशा प्रवृत्तींचा महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ, सिंधुदुर्ग यांच्यातर्फे निषेध नोंदवला जात आहे.महाराष्ट्रात अनेक दलित हत्याकांड झालेली आहेत. या सर्व हत्याकांडाबद्दल प्रथमत: ब्राह्मण समाजावर आरोप करण्यात आले असून या सर्व हत्याकांडाच्या चौकशीअंती कोण दोषी आहे हे साऱ्या जगाला माहिती झाले आहे. हे केवळ समाजामध्ये फूट पाडण्याकरीता केलेले षड्यंत्र आहे. अशा प्रवृत्तींना वेळेवर सरकारने ठेचून काढणे गरजेचे आहे. अन्यथा देशाच्या एकतेला व विश्वासाला धोका पोहोचेल. यावेळी जिल्हाध्यक्ष नीलेश सरजोशी, उपाध्यक्षा नीलम जोशी, कार्यवाह गुरुनाथ दामले, प्रकाश कुंटे, राजाराम चिपळूणकर, सुहास गोगटे, विजयकुमार कात्रे, प्रसाद पंडित, अविनाश मणेरीकर, पुरुषोत्तम हर्डीकर, सुधाकर जोशी, भिकाजी गणपत्ये, विजयकुमार मराठे, आनंद पुराणिक, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)