शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

चोवीस हजार खटल्यांचे काम ठप्प

By admin | Updated: September 12, 2015 00:50 IST

सर्किट बेंच प्रश्न : खंडपीठ कृती समितीची रविवारी कोल्हापुरात बैठक

कोल्हापूर : ‘सर्किट बेंच’प्रश्नी सुरू असलेल्या तीन दिवसीय ‘काम बंद’ आंदोलनाचा न्यायालयीन कामकाजावर चांगलाच परिणाम झाला. कोल्हापूरसह सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सुमारे २४ हजार खटल्यांचे कामकाज ठप्प झाले.खंडपीठ कृती समितीने जिल्हा न्यायालयासमोरील ठिय्या आंदोलनाचा शुक्रवारी दुपारनंतर समारोप केला. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी कृती समितीची उद्या, रविवार जिल्हा बार असोसिएशनच्या हॉलमध्ये दुपारी दोन वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी सहा जिल्ह्यांतील २०० पेक्षा जास्त वकील उपस्थित राहणार आहेत. सहा जिल्ह्यांतील वकील गेल्या तीस वर्षांपासून सातत्याने सर्किट बेंचसाठी संघर्ष करत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी ‘सर्किट बेंच’चा निर्णय न घेताच सेवानिवृत्ती घेतल्याने संतप्त वकिलांनी त्यांचानिषेध केला. त्यानंतर ९ ते ११ सप्टेंबरअखेर सहा जिल्ह्णांतील न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला. गुरुवारी काढण्यात आलेल्या महारॅलीमध्येही राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सहभाग दर्शविला होता. गेली तीन दिवस सहा जिल्ह्णांतील १५ हजार वकील न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहिले. वकिलांच्या या ‘काम बंद’ आंदोलनामुळे दिवाणी व फौजदारी न्यायालयांचे कामकाज पूर्णपणे बंद राहिले. त्यामुळे सहा जिल्ह्णांतील सुमारे २४ हजार खटल्यांची कामे ठप्प राहिली. दरम्यान, जिल्हा न्यायालयासमोर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आ. प्रकाश आबिटकर, आ. उल्हासदादा पाटील, माजी आ. संजय घाटगे, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, बाबासो देवकर, नाथाजी पोवार यांच्यासह पक्षकार, नागरिक, सामाजिक संघटना आदींनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. यावेळी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आंदोलनासाठी ५० हजार रुपयांची मदत दिली. आंदोलनस्थळी उपस्थितांचे स्वागत अ‍ॅड. अजित मोहिते, के. ए. कापसे, महादेवराव आडगुळे, शिवाजीराव राणे, धनंजय पठाडे, राजेंद्र जानकर आदींनी के‘सर्किट बेंच’च्या संघर्षामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते सर्वांत पुढे असतील. - हसन मुश्रीफ, आमदार ‘सर्किट बेंच’साठी होणाऱ्या आंदोलनामध्ये आपण अग्रभागी राहू.- सतेज पाटील, माजी गृहराज्यमंत्री ‘सर्किट बेंच’ची चळवळ अधिक तीव्र करू व प्रसंगी स्वत: त्यात पुढाकार घेऊ. - उल्हास पाटील, आमदार ‘सर्किट बेंच’चा निर्णय अर्ध्यावर ठेवून न्या. शहा यांनी घोर निराशा केली आहे. - प्रकाश आबिटकर, आमदार