शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

चिमुरड्या एधिताने अनुभवला ‘व्हॅली क्रॉसिंग’चा थरार

By admin | Updated: February 14, 2016 00:57 IST

विशाळगडावर उपक्रम : १५०० फूट खोल दरी; ६५० फुटांचे अंतर

 कोल्हापूर : विशाळगड येथे दीड हजार फूट खोल दरी आणि साडेसहाशे फूट लांबीचे अंतर असा साहसपूर्ण खेळाचा थरार आबालवृद्धांसह कोल्हापुरातील पाच वर्षांच्या एधिता विवेक आजरी हिनेही पूर्ण केला. अशा प्रकारे जीवघेण्या थरारामध्ये सहभागी होणारी ती पहिलीच लहान मुलगी आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच वेस्टर्न माउंटन स्पोर्टस व हिल रायडर्स गु्रपच्या वतीने स्वर्गीय गिर्यारोहक कार्तिक कांबोज यांच्या स्मरणार्थ विशाळगड येथे ‘व्हॅली क्रॉसिंग’चा थरार आयोजित केला होता. या झिप लाईन (व्हॅली क्रॉसिंग)मध्ये मोठ्यांनीही खाली पाहिले तर कोणाचेही डोळे गरगरायला लावील अशी दीड हजार फूट खोल दरी आणि कड्यावरून पाहिले असता जमिनीवरील माणूस मुंगीएवढा दिसतो, असे साडेसहाशे फूट लांबीचे अंतर, तेही दरीवरून अगदी ५५ ते ६० सेकंदांत पार करायचे, असा साहसपूर्ण खेळाचा थरार अनेकांनी अनुभवला. या साहसी उपक्रमात मोठ्या व्यक्तींबरोबर कोल्हापुरातील विवेक आजरी यांची पाचवर्षीय कन्या एधिता हिनेही ही दरी मोठ्या धैर्याने पार करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अशा प्रकारे जीवघेण्या थरारामध्ये सहभागी होणारी ती पहिलीच लहान मुलगी आहे. ती बड्स प्ले अ‍ॅँड प्री-प्रायमरी स्कूलमध्ये ज्युनिअर के.जी.मध्ये शिकत आहे. एधिताने यापूर्वीही अशा प्रकारचे साहस करीत दांडेली (जि. बेळगाव) येथे ‘रिव्हर क्रॉसिंग’चा अनुभव घेतला आहे. ज्येष्ठ गिर्यारोहक विनोद कांबोज, परेश चव्हाण, दीपा बुकशेठ यांचे मार्गदर्शन एधिता आजरी हिला लाभले. (प्रतिनिधी)