शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

थर्टीफस्टला ७५८ वाहनधारकांवर पोलिसी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:23 IST

कोल्हापूर : थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचा भंग करुन वाहन चालविणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. यावेळी ७५८ वाहनचालकांवर ...

कोल्हापूर : थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचा भंग करुन वाहन चालविणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. यावेळी ७५८ वाहनचालकांवर कारवाई करत त्यांच्याकडून ४३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला तर मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या १२ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरत्या वर्षाला घरात बसूनच निरोप देण्याचे आवाहन केले होते. यावेळी कायद्याचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार राज्यभरात सर्वत्र गुरुवारी दिवसभर व शुक्रवारी पहाटेपर्यंत कारवाई करण्यात आली. कोल्हापुरात झालेल्या कारवाईत प्रवेश बंद मार्गातून प्रवेश करणे, वाहन चालवताना मोबाईल वापरणे, एका दुचाकीवरुन दोनपेक्षा अधिकजणांनी प्रवास करणे, वाहनांचे क्रमांक विहीत नमुन्यात नसणे, नो पार्किंग, वाहन चालवताना सीटबेल्ट न लावणे, रहदारीला अडथळा निर्माण करणे अशाप्रकारे वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी ७५८ जणांकडून ४३ हजार ५०० रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे. यासाठी वाहतूक शाखा व सर्व पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र आपले कर्तव्य बजावले.

दंड असा आकारला

प्रवेश बंद मार्गातून प्रवेश करणे - ४७

वाहन चालवताना मोबाईलचा वापर - १८

दोनपेक्षा अधिकजण वाहून नेणे (ट्रीपल सीट) - ३८

फॅन्सी नंबरप्लेट - १०४

कर्णकर्कश हाॅर्न वाजविणे : १९

नो पार्किंग - १४

झेब्रा क्राॅसिंग - २३

सिंग्नल जंप करणे - ०१

रहदारीला अडथळा निर्माण होईल असे वाहन उभे करणे - १२२

वाहन चालवताना सीटबेल्ट न लावणे - ०९

हेल्मेटसह भरधाव वेगाने वाहन चालविणे अशी इतर कारवाई - ७५८

चौकट

थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत केलेल्या तपासणीत १२ जण मद्यप्राशन करून वाहने चालवताना आढळले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ब्रेथ अनालायझरचा वापर पोलिसांनी केला नाही. मात्र, संशयित वाटणाऱ्या वाहनचालकांची सीपीआर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. त्यामध्ये १२ जणांनी मद्यप्राशन केल्याचे आढळले. त्यांच्यावर कलम १८५नुसार कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले.