शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

तेरा युवकांना अटक

By admin | Updated: July 25, 2014 23:32 IST

आंबोली हाणामारी प्रकरण : सर्व तरुण आजऱ्यातील

सावंतवाडी : आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील महिलांची छेड काढून त्यांच्यासोबतच्या युवकांवर उकळलेले तेल फेकल्याप्रकरणी कोल्हापूर-आजरा येथील तेरा युवकांना सावंतवाडी पोलिसांनी आज, शुक्रवारी ताब्यात घेतले. त्यांना सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता, या सर्वांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवकांमध्ये मायाप्पा इलगे, स्वप्निल निकम, सुनील निकम, दीपक निर्मळे, सतीश निर्मळे, राजेंद्र निकम, तुषार निर्मळे, अजित निर्मळे, अजित निकम, नीलेश निकम, अशोक पाचवरेकर, अनिल नार्वेकर, अजित भेवडे यांचा समावेश आहे. याबाबतची माहिती अशी की, गेल्या रविवारी (दि. २०) कोल्हापूर येथील पर्यटक ट्रॅव्हलमधून हिरण्यकेशीकडे जात असतानाच तेथे एक सुमो गाडी आली. या गाडीतील युवकांनी ट्रॅव्हल्समधील महिला व युवतींची छेड काढली. यामुळे ट्रॅव्हल्समधील युवकांनी सुमो गाडीतील युवकांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला; पण त्या टॅ्रव्हल्समधील युवकांना सुमो गाडीतील युवकांनी बेदम मारहाण केली. मारहाण सुरू असतानाच ट्रॅव्हल्समधील बाबू मिशाळ हा नजीकच्या तावडे हॉटेलमध्ये पळाला. यावेळी सुुमोतील युवकांनी त्याचा पाठलाग करीत हॉटेलमधील कढईतील उकळलेले तेल त्याच्या अंगावर ओतले. यात बाबू मिशाळ हा गंभीर जखमी झाला आहे. या झटापटीमध्ये टॅ्रव्हल्समधील महिलांचे दागिनेही लंपास करण्यात आले आहेत. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी गाडीच्या नंबरवरून शोधाशोध सुरू केली. यावेळी ती सुमो गाडी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा-पारेवाडी येथील असल्याचे पोलिसांना समजले. त्यांनी आजरा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. आजरा पोलिसांनी त्या युवकांना आज आंबोली पोलीस ठाण्यात आणले. तेथून सावंतवाडी पोलिसांनी त्या तेराजणांना ताब्यात घेत सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या तेराही युवकांना जामीन मंजूर केला. (प्रतिनिधी)