शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

तिसरीही बैठक निष्फळ

By admin | Updated: March 4, 2016 01:10 IST

मजुरीवाढ प्रश्न : खर्चीवाले यंत्रमागधारकांची पुढील बैठक दोन आठवड्यांत घेण्याचे निर्देश

इचलकरंजी : खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीबाबत कापड व्यापारी संघटनेने दिलेला अंतिम प्रस्ताव अमान्य झाल्यामुळे येथील प्रांताधिकारी कार्यालयात चाललेली संयुक्त बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी १९ मार्चपर्यंत पुन्हा निर्णायक बैठक घेण्याचे निर्देश दिले.शहर व परिसरातील जॉबवर्क करणाऱ्या खर्चीवाले यंत्रमागधारकांना सन २०१३ मध्ये झालेल्या करारानुसार साडेपाच पैसे प्रतिपीक मजुरी दिली जाते. कापड व्यापाऱ्यांकडून देण्यात येणारी ही मजुरी प्रत्येकी तीन वर्षांनी बदलली जाते. म्हणून जानेवारी २०१६ पासून प्रतिपीक नऊ पैसे याप्रमाणे मजुरीवाढ मिळावी, अशी मागणी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत व्यापाऱ्यांच्या इचलकरंजी क्लॉथ अ‍ॅण्ड यार्न मर्चंटस् या संस्थेबरोबर यापूर्वी झालेल्या दोन बैठका निष्फळ झाल्या.अशा पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी गुरुवारी पुन्हा मजुरीवाढीसंदर्भात इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन व क्लॉथ अ‍ॅण्ड मर्चंटस् असोसिएशनच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. बैठकीसाठी सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव, कामगार अधिकारी द. दा. पवार, यंत्रमागधारकांच्यावतीने सतीश कोष्टी, नारायण दुरुगडे, चंद्रकांत पाटील, दत्तात्रय कनोजे, महंमदरफिक खानापुरे, पांडुरंग पाटील, आदी उपस्थित होते. तसेच व्यापारी संघटनेच्यावतीने उगमचंद गांधी, घन:शाम इनानी, विनोद कांकाणी, राजाराम भुतडा, आदींनी चर्चेत भाग घेतला.सुमारे तीन तास चाललेल्या बैठकीत परस्परांवरील आरोप-प्रत्यारोपांशिवाय चर्चा पुढे सरकत नव्हती. वारंवार प्रांताधिकारी जिरंगे व सहायक कामगार आयुक्त गुरव यांना बैठकीतील चर्चा मुद्द्यावर येण्यासाठी हस्तक्षेप करावा लागत होता. ५२ पीक कापडासाठी किमान दोन रुपये ६० पैसे इतकी मजुरी दिली जाईल, कोणत्याही परिस्थितीत त्यापेक्षा खाली मजुरी व्यापाऱ्यांकडून दिली जाणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असा व्यापारी संघटनेने दिलेला प्रस्ताव यंत्रमागधारक संघटनेने नाकारला.