शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांसाठी बनला चोर

By admin | Updated: May 8, 2016 00:41 IST

दीड लाखाचा माल जप्त : कोल्हापूरसह कऱ्हाड, पुण्यात चोऱ्या; संशयित उदगिरीचा

कोल्हापूर : स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या अभ्यासक्रमाची पुस्तके खरेदी करण्यासाठी पैशांची चणचण भासू लागल्याने कंपन्यांच्या कार्यालयात चोरी करणाऱ्यास शाहूपुरी पोलिसांनी सापळा रचून मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील जेम्स स्टोन परिसरात शनिवारी अटक केली. शादाप रज्जाक पटेल (वय २१, रा. उदगिरी, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून लॅपटॉप, मोबाईल, परकीय चलन, कॅमेरा, टॅब असा सुमारे एक लाख ४७ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पटेलने कोल्हापूरसह कऱ्हाड, पुणे या ठिकाणी अशा आतापर्यंत आठ चोऱ्या केल्या असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. चौधरी म्हणाले, जेम्स स्टोन परिसरात एकजण मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी या परिसरात सापळा रचला. शनिवारी दुपारी तो तेथून येत असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले व पोलिस ठाण्यात आणले. त्याने शादाप रज्जाक पटेल असे नाव सांगितले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने जानेवारी २०१६ मध्ये शाहूपुरीतील स्टर्लिंग टॉवर, राजाराम रोडवरील एम. जे. प्लाझा येथील एका कार्यालयात, स्टेशन रोडवरील प्रभाकर प्लाझा, पाच बंगला, शाहूपुरी परिसरात रॉयल प्लाझा व दसरा चौकातील व्हाईट हाऊस या ठिकाणी, तर गांधीनगर (ता. करवीर) येथे फर्निचरच्या दुकानामध्ये तसेच स्टर्लिंग टॉवरमधील कार्यालयातून परकीय चलन चोरले असल्याची कबुली दिली. ही कारवाई गुन्हेशोध पथकाचे पोलिस कॉन्स्टेबल संजय जाधव, अमर आडूळकर, समीर मुल्ला, विशाल बंद्रे, प्रशांत पांडव, अरविंद पाटील, ओंकार परब, सागर माळवे, रमजान इनामदार, धनंजय परब, आदींनी केली. (प्रतिनिधी)