शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

आंदोलनस्थळी चोरट्यांनी केले हात साफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:16 IST

कोल्हापूर : मराठा आरक्षण मूक आंदोलनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, तेथे भुरट्या चोरट्यांचाही मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट दिसून आला. या ...

कोल्हापूर : मराठा आरक्षण मूक आंदोलनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, तेथे भुरट्या चोरट्यांचाही मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट दिसून आला. या गर्दीत कार्यर्त्यांच्या खिशातील पाकीट मारणारे व सोन्याच्या चेनला हिसडा मारणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली होती. या चोऱ्या करण्यासाठी करमाळा (जि. सोलापूर) येथूनही भुरट्या चोऱ्या करणारी टोळी आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

मराठा समाज आरक्षण आंदोलनासाठी राज्यातून निमंत्रितांना बोलावले होते. या आंदोलनाची सुरुवात कोल्हापुरातील ऐतिहासिक नर्सरी बागेतून होणार असल्याने तेथे मोठी गर्दी होणार, हे अपेक्षितच होते. हाच फायदा घेत परजिल्ह्यातील पाकीटमार चोरट्यांनी या आंदोलनाकडे लक्ष वेधले. या चोरट्यांनी आंदोलनस्थळी झालेल्या गर्दीचा फायदा उठवत काही कार्यकर्त्यांच्या खिशातील पैशाची पाकिटे चोरली तसेच काहींच्या गळ्यातील सोन्याच्या चेनचीही चोरी झाली. या चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी साध्या गणवेशातील पोलीस गर्दीत सोडले. त्यावेळी पैशाचे पाकीट तसेच सोन्याची चेन चोरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस तसेच लक्ष्मीपुरी पोलिसांनी पकडले. यामुळे ही चोरट्यांची टोळी हात साफ करण्यासाठी आली असल्याच्या शक्यतेने पोलिसांनी परिसरातील काही लॉजचीही तपासणी केली, त्यावेळी करमाळा (जि. सोलापूर) येथील चार संशयित युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्या चारही संशयितांकडे सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस अधिकारी चौकशी करत होते.