शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

कराडात दुचाकी चोरून कोल्हापुरात विकणाऱ्या चोरट्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:29 IST

कोल्हापूर : कराड शहरातील दुचाकी चोरून त्या कोल्हापुरात विकणाऱ्या सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने आरळे (ता. पन्हाळा) ...

कोल्हापूर : कराड शहरातील दुचाकी चोरून त्या कोल्हापुरात विकणाऱ्या सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने आरळे (ता. पन्हाळा) येथे शनिवारी अटक केली. आकाश ऊर्फ सोन्या आनंदा पाटसुपे (वय २८ रा. मुजावर कॉलनी, मार्केट यार्ड, कराड, जि. सातारा) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून सुमारे २ लाख १० हजाराचा चोरीच्या एकूण ५ दुचाकी जप्त केल्या.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस आरळे (ता. पन्हाळा) येथे पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी आकाश पाटसुपे याला संशयावरून ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याच्या ताब्यात पाच दुचाकी मिळाल्या. त्याबाबत सखोल चौकशी केली असता, त्या चोरीच्या असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. याबाबत त्याने दिलेल्या माहितीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात चौकशी केली असता, तेथे पाच दुचाकी चोरीच्या तक्रारी दाखल आहेत. त्याने, त्या पाचही दुचाकी कोल्हापूर जिल्ह्यात विक्री करण्यासाठी आल्याचे सांगितले. संशयित आरोपीवर सातारा जिल्ह्यात अशा प्रकारचे चोरीचे ४ गुन्हे दाखल आहेत. याबाबत संशयित चोरटा पाटसुपे याच्यासह चोरीच्या जप्त केलेल्या पाचही दुचाकी पोलिसांनी कराड शहर पोलिसांच्या ताब्यात दिल्या.

ही कारवाई पोलीस निरीक्षण प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौजदार विजय गुरखे, चंदू नन्नवरे, सचिन देसाई, वसंत पिंगळे, कृष्णात पिंगळे, हिंदूराव केसरे, दीपक घोरपडे, सोमराज पाटील यांनी केली.

फोटो नं. ११०९२०२१-कोल-क्राईम०१

ओळ : कराड शहरातील दुचाकी चोरून त्या कोल्हापुरात विकणाऱ्या सराईत चोरटा आकाश पाटसुपे याला आरळे (ता. पन्हाळा) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने शनिवारी अटक केली.

110921\11kol_1_11092021_5.jpg

ओळ : कराड शहरातील दुचाकी चोरुन त्या कोल्हापूरात विकणार्या सराईत चोरटा आकाश पाटसुपे याला आरळे (ता. पन्हाळा) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने शनिवारी अटक केली.