कोल्हापूर : कऱ्हाड येथील मोबाईल शॉपी फोडून त्यातील मोबाईल चोरणाऱ्या सराईत चोरट्यास कोल्हापुरात राजारामपुरीत गुरुवारी दुपारी अटक केली. संभाजी राजू कांबळे (वय २२, रा. मु. पो. मुंढे, ता. जि. सातारा) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीतील दोन लाख रुपये किमतीचे सुमारे १६ नवीन मोबाईल जप्त केले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करत असताना एक तरुण माऊली पुतळ्यानजीक हँडबॅगमधून नवीन मोबाईल विक्रीसाठी घेऊन आल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दुपारी तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यानंतर त्याने आपले नाव संभाजी कांबळे असे सांगितले. त्याने कऱ्हाड येथील साईबाबा मंदीरनजीकची मोबाईल शॉपी फोडून तेथील मोबाईल चोरल्याची कबुली दिली. ते चोरलेले मोबाईल विक्री करण्यासाठी कोल्हापुरात आल्याचेही त्याने सांगितले. त्यानुसार त्याला अटक करून त्याच्या ताब्यातील एकूण २ लाख २ हजार ६०० रुपये किमतीचे एकूण १६ नवीन मोबाईल संच जप्त केले. ही कारवाई राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक वाय. डी. ओमासे, गुन्हे शोध पथकातील हे. कॉ. समीर शेख, संदीप सावंत, युक्ती ठोंबरे, सत्यजित सावंत, विशाल शिरगावकर, रवी आंबेकर यांनी केली.
फोटो नं. ०९०९२०२१-कोल-संभाजी कांबळे (मोबाईल चोर)
फोटो नं. ९०९०२०२१-कोल-मोबाईल
ओळ : कऱ्हाड येथील मोबाईल शॉपी फोडून त्यातील चोरलेले मोबाईल कोल्हापुरात विक्री करत असताना गुरुवारी आरोपीकडून जप्त केले.
090921\09kol_9_09092021_5.jpg~090921\09kol_10_09092021_5.jpg
फोटो नं. ०९०९२०२१-कोल-संभाजी कांबळे (मोबाईल चोर)फोटो नं. ९०९०२०२१-कोल-मोबाईलओळ : कराड येथील मोबाईल शॉपी फोडून त्यातील चोरलेले मोबाईल कोल्हापूरात विक्री करत असताना गुरुवारी आरोपीकडून जप्त केले.~फोटो नं. ०९०९२०२१-कोल-संभाजी कांबळे (मोबाईल चोर)फोटो नं. ९०९०२०२१-कोल-मोबाईलओळ : कराड येथील मोबाईल शॉपी फोडून त्यातील चोरलेले मोबाईल कोल्हापूरात विक्री करत असताना गुरुवारी आरोपीकडून जप्त केले.