शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ धमकीपत्र मंगळवार पेठ पोस्टातून

By admin | Updated: April 26, 2016 00:14 IST

पोलिस अधीक्षक : स्थानिक व्यक्तीचे कृत्य असण्याची शक्यता

कोल्हापूर : येथील ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांना निनावी धमकी पत्रापाठोपाठ अज्ञात व्यक्तीने फोनवरून दिलेली धमकी हे स्थानिक व्यक्तीचे कृत्य असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे. देसाई यांना आलेले पत्र हे जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील मंगळवार पेठ पोस्टातून आल्याचे निष्पन्न झाले आहे. लवकरच आम्ही या घटनेमागच्या सूत्रधारास अटक करू, असे पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. देसाई यांना ‘सनातन धर्माला, सनातन परंपरेला आणि पुरोहितांना विरोध करू नका. आमच्या तीन गोळ््यांनी अचूक वेध घेतलाय. चौथ्या गोळीवर स्वत:चे नाव लिहून घेण्याचा अट्टाहास सोडा. नशिबाने एक देसाई वाचली, दुसऱ्या देसाई यांचे नशीब साथ देईलच असे नाही,’ या आशयाचे धमकीचे निनावी पत्र आल्याने खळबळ उडाली. या पत्राची वरिष्ठ पातळीवर गोपनीय चौकशी सुरू असतानाच त्यांच्या कार्यालयातील लँडलाईन नंबरवर फोन आला. ‘मी आॅस्ट्रेलियातून रवी पुजारी बोलतोय, ‘अंबाबाई’च्या मंदिरातील पुजाऱ्यांच्या जिवावर उठलाय तुम्ही, हे थांबवा, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील’ अशी धमकी दिली. पोलिस प्रशासनाने या धमकीची गांभीर्याने दखल घेत फोन कुठून आला, त्याची माहिती सायबर सेलकडून घेण्याचा प्रयत्न केला. देसाई यांचे दोन्हीही नंबर बीएसएनएलचे असल्याने सायबर सेलने भारत संचार निगम (बीएसएनएल) विभागाच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधून देसाई यांच्या लँडलाईन नंबरच्या कॉल डिटेल्सची माहिती मागविली. सोमवारी रात्री त्याचे डिटेल्स पोलिस अधीक्षक देशपांडे यांच्या हाती मिळाले. देसाई यांना आलेले पत्र मंगळवार पेठेतील पोस्ट कार्यालयातून आले आहे. त्यामुळे या पोस्ट कार्यालयाच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही फुटेज पोलिस बारकाईने तपासत आहेत. ‘सनातन’ व हिंदुत्ववादी संघटनेचे काही साधकही पोलिसांच्या रडावर आहेत. देसाई यांनी प्रसिद्ध केलेल्या अंबाबाईच्या पुस्तकावरून कोणी दुखावले असण्याची शक्यता आहे. तृप्ती देसाई यांच्या गाभार प्रवेश वादानंतरच देसाई यांना धमकी आली. त्यामुळे सर्व बाजूंनी व अत्यंत अभ्यासपूर्ण या प्रकरणी तपास सुरू आहे. आतापर्यंतच्या तपासामध्ये स्थानिक व्यक्तीचे हे कृत्य असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिस कसोशीने तपास करत आहेत. देसाई यांच्या कार्यालय व साळोखेनगर येथील निवासस्थानी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. परिसरातही साध्या वेशात पोलिसांचे पथक टेहाळणी करत असल्याचे देशपांडे यांनी यावेळी सांगितले.