शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बिंदू चौकात पाणी पेटले

By admin | Updated: April 4, 2016 01:10 IST

तिघे जखमी : टँकरवरून दोन गटांत हाणामारी; तलवार हल्ला

कोल्हापूर : बिंदू चौकात पाण्याच्या टँकरवरून बाराईमाम व भोई गल्ली येथील तरुणांच्या दोन गटांत झालेल्या तलवार हल्ल्यात तिघेजण जखमी झाले. तौसिफ आरिफ मोमीन (वय २५), झाकीर सय्यद मोमीन (४५, दोघे रा. बाराईमाम), हाकिब मुसा सौदागर (२४, रा. भोई गल्ली) अशी त्यांची नावे आहेत. दोन्ही बाजूंच्या तरुणांनी परिसरात प्रचंड दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मीपुरी व जुना राजवाडा पोलिसांची फौज घटनास्थळी आल्याने हल्लेखोर पसार झाले. या घटनेनंतर तणाव पसरल्याने रात्री उशिरापर्यंत या परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवला. दरम्यान, लक्ष्मीपुरी पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पाणीटंचाईमुळे गेल्या दोन दिवसांपासून बिंदू चौक परिसरात महापालिकेच्या टँकरने पाणी पुरविले जात आहे. रविवारी रात्री सातच्या सुमारास गंजी गल्ली येथे पाण्याचा टँकर आला. हा टँकर झाकीर मोमीन हे स्वत:साठी घेऊन जाऊ लागले. यावेळी टँकरचा नळ सोडण्यावरून बाराईमाम व भोई गल्ली येथील तरुणांच्यात वादावादी झाली. हा वाद दोन्ही गटांच्या ज्येष्ठांनी मिटविला. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास दोन्ही गटाचे शंभरापेक्षा जास्त तरुण बिंदू चौकात आले. दोन्ही गट प्रतिष्ठेला पडल्याने त्यांच्यात जोरदार वादावादी होऊन धक्काबुक्की झाली. यावेळी दोन्ही गटांतील काही तरुण घरातून नंग्या तलवारी नाचवत चौकात आले. चिडीला पडलेले तरुण एकमेकांशी भिडले. यावेळी जोरदार धूमश्चक्री उडाली. दोन्ही गटांतील राडा पाहून सूज्ञ नागरिकाने या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. लक्ष्मीपुरी व जुना राजवाडा पोलिस तत्काळ घटनास्थळी आले. पोलिस आल्याचे पाहून दोन्ही गटांच्या तरुणांनी तेथून पलायन केले. दरम्यान, दोन्ही गटांचे कार्यकर्ते जखमींना घेऊन लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात आले. याठिकाणी त्यांनी परस्परविरोधी फिर्यादी देण्याची भूमिका घेतली. पोलिसांनी जखमींना सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी करण्याचे सांगितले. दोन्ही गटांचे जखमी सीपीआरमध्ये आले. याठिकाणी पुन्हा दोन्ही गट आमने-सामने आल्याने तणाव निर्माण झाला. सीपीआर आवारात पोलिस बंदोबस्त ठेवला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)