शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आली गवर.. सोन पावली आली...

By admin | Updated: September 3, 2014 00:15 IST

घरोघरी गौरीचे आगमन : पंचगंगा नदीकाठी रंगला झिम्मा- फुगडी

कोल्हापूर : ‘सोनियाच्या पावलांनी,गवर आली माहेराला।गवर आली माहेराला,भाजी भाकर जेवायाला।।भाजी भाकर जेवली,रानोमाळी हिंडली।रानोमाळी हिंडली,पानाफुलांनी बहरली...।।अशा पारंपरिक गीतांच्या साथीने घरोघरी गौराईचे आगमन झाले. पाना-फुलांनी बहरलेल्या आणि हळदी-कुंकवाच्या पावलांनी घराचा उंबरठा ओलांडताना पावलागणिक धन-धान्य, माणिकमोती, सुख-शांती समृद्धी घेऊन येणाऱ्या गौरीची लाडक्या गणरायाच्या शेजारी प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेश आगमनानंतर गौराईचे स्वागत होते. माहेरावाशीण म्हणून आलेल्या गौरीला पहिल्या दिवशी भाजी, भाकरी, वडीचा नैवेद्य आणि दुसऱ्या दिवशी पुरणपोळीच्या सुग्रास पक्वान्नांचा नैवेद्य दाखवला जातो. माहेरी आलेल्या पत्नीला आणि गणरायाला बोलावायला पाठोपाठ शंकरोबा येतो. या परिवार देवतांच्या प्रतिष्ठापनेने घराघरांत मांगल्य, समृद्धी आणि उत्साह, आनंदाची बरसात होते. आज, मंगळवारी सकाळी अकराच्या दरम्यान काठाच्या नऊवारी साडीसह अंबाड्यावर माळलेला गजरा, नाकात नथ, सोन्याच्या अलंकारांनी सजलेल्या महिला पंचगंगा नदीकाठावर गौराईच्या पूजनासाठी जमल्या. तांब्याच्या तांब्यात नदीचे पाणी घेऊन त्यात हळदी-कुंकू, सुपारी, तांदूळ, रुपया, दुर्वा घालून त्यावर गवर ठेवली. समोर पाच खडे पुजून गणपती आणि गौरीची आरती झाली. त्यानंतर घाटावरच रंगला झिम्मा-फुगडीचा खेळ...‘आली गवर आली, सोन पावली आली... सोनियाच्या पावलांनी, गवर आली माहेराला...’, ‘आट्या पाट्या चंदनी लाट्या’, अशा पारंपरिक गीतांवर महिलांनी फेर धरला आणि हातात गौरी घेऊन घराकडे निघाल्या. दारात सडा, रंगीबेरंगी रांगोळ्या काढून पाटावर तांब्याच्या तांब्यात पाणी, दुर्वा, हळद-कुंकू, सुपारी, रुपया टाकून त्यावर गौरीची वनस्पती चाफ्याच्या पानात बांधून बसवली. दारापासून गौरीची प्रतिष्ठापना करेपर्यंतच्या जागेत रांगोळीने लक्ष्मीची पावले काढली. अन् गणपती बाप्पाच्या शेजारी विराजमान झाली. गणपती आणि गौरीची आरतीनंतर देवीला भाजी-भाकरी, वडी, दही-भाताचा नैवेद्य दाखवण्यात आला. उद्या, बुधवारी गौरी पूजनाचा दिवस असतो. यादिवशी शंकरोबाची प्रतिष्ठापना होते. (प्रतिनिधी)