लोकमत न्यूज नेटवर्क
सडोली (खालसा)
: गावा-गावातून स्वच्छतेची लोकचळवळ उभी राहणे गरजेचे आहे. लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी परिसराची स्वच्छता महत्त्वाची असून, स्वच्छता ही सेवा अभियान प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांनी केले. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ‘शाश्वत स्वच्छतेसाठी स्वच्छता’ ही सेवा अभियानाच्या प्रारंभप्रसंगी सडोली खालसा (ता. करवीर) येथे राहुल पाटील बोलत होते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण म्हणाले, स्वच्छता ही आपल्या भारतीय संस्कृतीचा भाग आहे. आपले गाव आज स्वच्छतेच्याबाबतीत अग्रेसर राहील. हाच वारसा पुढच्या पिढीला देऊ शकतो.
यावेळी गावात स्वच्छताविषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, कोरोना काळात काम केलेल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत सरपंच अमित पाटील यांनी केले. जिल्हा परिषद जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालिका प्रियदर्शनी मोरे यांनी प्रास्ताविक केले. करवीर गटविकास अधिकारी जयवंत उगले यांनी आभार मानले.
उद्योजक रवींद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य सविता पाटील, उपसरपंच तेजस्विनी पाटील, पोलीसपाटील पंकजकुमार पवार-पाटील, तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र पाटील, बाजीराव पाटील आदी उपस्थित होते.
फोटो ओळ
सडोली (खालसा) ता. करवीर येथे स्वच्छ भारत मिशन अभियानचा प्रारंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, मुख्य कार्यकारी संजयसिंह चव्हाण, सरपंच अमित पाटील, प्रियदर्शनी मोरे, गटविकास अधिकारी जयवंत उगले यांच्या उपस्थितीत झाला.
फोटो दिव्या फोटो गाडेगोंडवाडी
१७ सडोलीखालसा स्वच्छता अभियान