शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्ता, घटनात्मकरीत्या टिकणारे आरक्षण हवे

By admin | Updated: May 1, 2017 01:17 IST

राजेंद्र कोंढरे : मराठा आमसभेत व्याख्यान, पाच दिवसांत उत्तरकार्य करण्याचा ठराव मंजूर

कोल्हापूर : आरक्षणासाठी देशात अनेक हिंसक आंदोलने होऊन त्यांत नऊ राज्यांत आरक्षणाचे निर्णय घेतले; परंतु नंतर त्यांना न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे न्यायालयातील लढाई ही तलवारीने नाही तर गुणवत्तेवरच लढावी लागते. मराठा समाजासाठी गुणवत्ता आणि घटनात्मकरीत्या टिकेल असेच आरक्षण हवे आहे. त्यासाठी मराठा समाजातील अभ्यासू व विचारवंतांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी रविवारी येथे केले.मार्केट यार्ड येथील राजर्षी शाहू सांस्कृतिक मंदिर येथे अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे मराठा आमसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते ‘मराठा आरक्षण’ या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पुणे ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, महापौर हसिना फरास, खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार चंद्रदीप नरके, सतेज पाटील, सुरेश हाळवणकर, उल्हास पाटील, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे, शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, डॉ. बी. एम. हिर्डेकर, आदी प्रमुख उपस्थित होते.कोंढरे म्हणाले, संपूर्ण जगात गाजलेल्या मराठा क्रांती मोर्चाचे पुढे काय झाले, अशी विचारणा मराठा समाज करीत आहे. आरक्षणाबाबत समाजाची भावना तीव्र असून यासाठी गेली २० वर्षे आपण संघर्ष करीत आहोत. याची दखल घेऊन सरकारने विधिमंडळात कायदा केला; पण तो न्यायिक पातळीवर अडकला आहे. मराठा आरक्षण हे प्रगती करण्याचे अस्त्र असून जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी समाजबांधवांनी स्वत:चे मूल्यमापन करण्याची आवश्यकता आहे.ते पुढे म्हणाले, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील मराठा समाजबांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकते. याबाबत सरकारने निर्णय घेतल्यास तेथील ४५ टक्के मराठ्यांचा ‘ओबीसी’मध्ये समावेश होण्याचा मार्ग मोकळा होईल. यासाठी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घोषणा करावी. (प्रतिनिधी)सभामंडपाऐवजी विज्ञान केंद्रे बांधामराठा भवनची संकल्पना ही फक्त मंगल कार्यालयापुरती मर्यादित न राहता त्या ठिकाणी समाजाचे चिंतन होऊन क्रिया व कृती करण्यासाठी समाजबांधवांनी स्वत:मध्ये बदल करण्याची गरज आहे. गावात सभामंडप बांधण्याऐवजी विज्ञान केंद्रे, ग्रंथालये, गोडावून बांधल्यास त्यांचा समाजासाठी खऱ्या अर्थाने उपयोग होईल, असे कोंढरे यांनी सांगितले.मराठा भवन उभारणीसाठी जागा हवी : मुळीकप्रास्ताविकपर भाषणात जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, मराठा समाज आज रूढी-परंपरांमध्ये अडकला आहे, त्याला दिशा देण्यासाठी मराठा महासंघ प्रयत्न करत आहे. महासंघ विज्ञाननिष्ट काम करत आहे. मराठा भवन उभारणीसाठी किमान सहा एकर जागा हवी असून ती शासनाने द्यावी, अशी मागणी मुळीक यांनी केली. शासनाने जागा दिल्यानंतर भवनच्या उभारणी निधीसाठी प्रसंगी झोळीही हातात घेऊ, असेही ते म्हणाले.मुलींचा जन्मदर वाढणे आवश्यक : महाडिकमराठा भवन व्हावे ही सर्वांची इच्छा आहे; पण लग्न, हुंडा या परंपरेत अडकलेल्या समाजात जागृतीची गरज आहे. आज मुलींचा जन्मदर घटतो आहे ही गंभीर बाब आहे. त्यासाठी प्रत्येक गावात गर्भवतीची प्रथम तपासणी केल्यानंतर त्याची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात व्हावी, त्यानंतर त्या पोलिस ठाण्यातील महिला पोलिसाने दर तीन महिन्यांनी संबंधित गर्भवती महिलेच्या घरी जाऊन तिचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करावे, त्यामुळे त्या गर्भवती महिलेच्या मनात आदरयुक्त भीती राहिल्याने ती कोणताही गैरमार्ग अवलंबणार नाही. त्यातून मुलींचा जन्मदर वाढीस मदत मिळेल, अशीही अपेक्षा व्यक्त केली. मराठा भवनबाबत ते म्हणाले, ‘मराठा भवन’ची इमारत देखणी असावी ती पाहण्यासाठी राज्यातून लोक यावेत. त्या इमारतीबाबत मी व संभाजीराजे दोघे मिळून पाठपुरावा करू, असेही ते म्हणाले.मराठा आचारसंहिताआमसभेमध्ये मराठा समाजाच्या आचारसंहितेविषयी चर्चा झाली. त्यामध्ये वास्तुशांती, लग्नकार्य आदी समारंभात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करावे, सामुदायिक विवाह पद्धतींना प्रोत्साहन करणे, विवाहाचा बडेजाव न करता अनाठायी खर्च टाळावा. हुंडा पद्धत बंद करावी आदींचा समावेश आहे.एकच मिशन...मराठा भवन....मराठा आमसभेत प्रास्ताविकात वसंतराव मुळीक यांनी ‘एकच मिशन...मराठा भवन-२०१७’ अशी घोषणा केली. त्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.मराठा भवन हे बहुजनांसाठी असावे : संभाजीराजेमराठा भवन ही इमारत फक्त मराठा समाजासाठी नसावी, ती बहुजनांसाठीही उपलब्ध करून द्यावी, हीच शाहू महाराजांची शिकवण आहे. मराठा समाजावर अन्याय होत आहे हेही राज्यभर पटवून सांगितले पाहिजे, मराठा भवनमध्ये अद्ययावत लायब्ररी, विज्ञान केंद्र करून नवी पिढी घडवावी, अशीही अपेक्षा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली.दादा, ‘भवन’साठी जागा द्या : सतेज पाटील‘मराठा भवन’साठी आयटी पार्क परिसरातील सहा एकर सरकारी जागा द्यावी. त्यासाठी एक रुपयाचाही निधी कमी पडू देणार नाही, असे सांगून आमदार सतेज पाटील म्हणाले, दादा, मराठा भवनसाठी फक्त जागा द्या, तुमच्याकडे उभारणीसाठी आम्ही काहीही पैसे मागणार नाही, असेही ते म्हणाले.जागेसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ : हाळवणकरमराठा भवन हे फक्त मराठा समाजासाठीच असावे, यासाठी प्रत्येकाने किमान १ रुपयाचा निधी द्यावा. इचलकरंजी मतदारसंघातून जास्तीत-जास्त निधी मिळवून देऊ. ‘मराठा भवन’साठी जागेकरिता सर्वपक्षीय आमदारांसह आज, सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊ, असे हाळवणकर म्हणाले.आरक्षणाबद्दल सरकार सकारात्मक : नरकेमराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे, मराठा भवनच्या जागेबाबत मार्ग काढण्यासाठी सर्वजण एकत्र येऊया, ‘मराठा भवन’साठी पैसे जमा करण्याची प्रत्येकाकडे स्वतंत्र जबाबदारी सोपवावी, असे आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले.मी गिरणी कामगारांचा मुलगा : चंद्रकांतदादासभागृहात मराठा भवन उभारणीसाठी निधी घोषणांचा पाऊस पडत होता. त्यावेळी मंत्री चंद्रकांतदादा म्हणाले, मी लई पैसे देऊ शकत नाही, कारण मी गिरणी कामगाराचा मुलगा आहे; पण माझ्याकडे ताकद आहे, त्यामुळे जागा मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू.कष्ट आमचे, मार्केटिंग बंटींचेखासदार धनंजय महाडिक, संभाजीराजे छत्रपती काही वेळाने कार्यक्रमातून निघून गेल्यानंतर आमदार सुरेश हाळवणकर भाषण करत होते, त्यांनी पाठीमागे दोघेही नसल्याचा उल्लेख करत ठीक आहे, संभाजीराजेंचे प्रतिनिधी बंटी येथे आहेत, असे म्हणताच सतेज पाटील यांनी कपाळावर हात मारला. त्यावेळी संभाजीराजेंना खासदार करण्यासाठी आम्ही कष्ट घेतले, पण त्याचे मार्केटिंग बंटीच करत आहेत, असे म्हणताच सभागृहात हशा पिकला.