शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

किमान वेतनाशिवाय आता माघार नाही

By admin | Updated: August 29, 2015 00:34 IST

नरसय्या आडम : बंद यशस्वी करण्यासाठी कामगारांनी रस्त्यावर उतरावे

इचलकरंजी : सुधारित किमान वेतनप्रश्नी सुरू असलेला लढा तीव्र करताना आम्ही बेचिराख झालो तरी चालेल; पण आता माघार नाही, असा इशारा कामगार नेते तथा माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिला. तसेच यासाठी कामगारांनी एकजूट दाखवावी. २ सप्टेंबरच्या इचलकरंजी बंदसाठी सर्व कामगारांनी रस्त्यावर उतरावे. गावभर फिरून बंद यशस्वी करावा, असे आवाहनही केले.सायझिंग-वार्पिंग कामगारांच्या बेमुदत काम बंद आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी येथील वंदे मातरम् मैदानावर यंत्रमाग कामगार संयुक्त कृती समितीच्यावतीने शुक्रवारी आयोजित कामगारांच्या जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी हणमंत लोहार होते.आडम म्हणाले, जगाच्या पाठीवर सर्वत्र ५० हजार रुपये इतके किमान वेतन असताना आम्ही केवळ दहा हजार ५७३ रुपयांची मागणी करता यंत्रमाग मालकांच्या पोटात शूळ उठत आहे. राज्यातील यंत्रमागधारकाला केंद्र व राज्य शासनाकडून दरवर्षी विविध योजनांच्या नावाखाली वीज दरात, व्याजात अन् कर्जात सवलत देत कोट्यवधी रुपयांची उधळण केली जाते. मात्र, काबाडकष्ट करणाऱ्या कामगाराला एक पैसुद्धा मिळाली नाही. तर सध्याचे मोदी सरकारसुद्धा भांडवलदारांच्या बाजूचेच आहे. देश स्वातंत्र्याच्या ६८ वर्षानंतर राज्यातली १४, तर केंद्रातील ४४ असे एकूण ५८ कायदे मोडीत काढण्याचा डाव आखला आहे; पण हा डाव मोडून काढण्यासाठी २ सप्टेंबरला आयोजित देशव्यापी संपात सर्वच क्षेत्रातील कामगारांनी एकजूट दाखवावी. इचलकरंजी बंदची जी हाक दिली आहे, त्यामध्ये छोट्या-छोट्या विक्रेत्यांपासून मोठ्या उद्योगातील कामगारांनी संपात सहभागी व्हावे. आमदार सुरेश हाळवणकर यांचा उल्लेख करताना आडम म्हणाले, हाळवणकर यांनी आपल्या सायझिंगमधील कामगारांना एक हजार रुपयांची वाढ देऊन सायझिंग सुरू केले आहे. त्यांना सूचलेले हे शहाणपण इतर सायझिंगधारकांना का बरे सूचत नाही, असा सवालही त्यांनी व्यक्त केला.मेळाव्यात अतुल दिघे, ए.बी.पाटील, सुभाष जाधव, दत्ता माने, राजेंद्र निकम, भरमा कांबळे, धोंडीबा कुंभार, आदींची भाषणे झाली. (वार्ताहर)शासनाचे म्हणणे कामगारांच्या बाजूनेसुधारित किमान वेतनप्रश्नी राज्य शासनाने आपले म्हणणे न्यायालयात सादर केले आहे. ते मुख्य किमान वेतनाच्या सुसंगत व कामगारांच्या बाजूने आहे, असे कार्यालयाकडून समजले आहे. ३१ आॅगस्टच्या सुनावणीवेळी त्याचा दणका न्यायालय नक्कीच देईल, असेही आडम यांनी जाहीर सभेत सांगितले.