शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘बीएलओं’ला निवडणूक विभागाकडील फॉर्म आणायला वेळ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:22 IST

प्रवीण देसाई । कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीची मोहीम गतीने सुरु आहे; परंतु आळसावलेल्या ‘बीएलओं’मुळे नागरिकांना मनस्ताप ...

प्रवीण देसाई ।कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीची मोहीम गतीने सुरु आहे; परंतु आळसावलेल्या ‘बीएलओं’मुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. निवडणूक विभागाकडे मतदार नोंदणीचे फॉर्म उपलब्ध असूनही ते आणण्यास त्यांना वेळ नाही. उलट ‘तुम्हीच झेरॉक्स काढा,’ असे नागरिकांना सांगून त्यांना भुर्दंड घालण्याचे प्रकार होत आहेत.निवडणूक आयोगाने १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीमध्ये मतदार नोंदणीसाठी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. यामध्ये नावनोंदणी, नावातील दुरुस्ती, मतदारांची रंगीत छायाचित्रे गोळा करणे, आदी कामे मतदान केंद्रस्तरीय अधिकारीच्या (बीएलओ) माध्यमातून करायची आहेत. जिल्हा निवडणूक विभागाने हे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे; परंतु काही ‘बीएलओ’ मात्र जिल्हा प्रशासनालाही जुमानायला तयार नाहीत. रविवारी सुट्टीदिवशी विशेष मोहीम घेण्यात येत आहे. हा रविवार शेवटचा असल्याने बहुतांश मतदान केंद्रांवर नोंदणीसाठी गर्दी होती. नावनोंदणी, स्थलांतरण, नावात दुरुस्ती यांसाठी निवडणूक विभागाकडून सर्वच ‘बीएलओं’ना फॉर्म उपलब्ध करून दिले आहेत; परंतु काही आळसावलेल्या ‘बीएलओं’नी कळसच केला आहे. ते निवडणूक विभागाकडे फॉर्मच आणायला फिरकलेले नाहीत. त्यांनी आपल्याच पातळीवर ‘फॉर्मची झेरॉक्स काढा आणि नावनोंदणी करा,’ असा फॉर्म्युला राबविला आहे. दौलतनगर शेजारील एका शाळेत, तसेच राजेंद्रनगर येथील एका मतदान केंद्रातील हा प्रकार रविवारी समोर आला. नावनोंदणी व स्थलांतरासंदर्भातील फॉर्म मागण्यासाठी गेलेल्या नागरिकाला ‘तुम्हीच झेरॉक्स काढून आणा,’ असा सल्ला ‘बीएलओं’नी दिला. सुट्टीचा दिवस असल्याने बहुतांश ठिकाणची झेरॉक्स सेंटर बंद असल्याने नागरिकांची दिवसभर फरफट झाली. हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे.निवडणूक विभागाकडे चौकशी केली असता पुरेशा प्रमाणात फॉर्म उपलब्ध आहेत. जर फॉर्म संपले असतील तर संबंधित ‘बीएलओ’ने ते येऊन नेण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. नागरिकांना परस्पर झेरॉक्स काढायला लावणे हे चुकीचे असून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले.