शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

निधीसाठी पालकमंत्र्यांना दहावेळा विनंती करून साधी बैठकही नाही : सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 00:53 IST

कोल्हापूर : शहराचे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी, तसेच शहराच्या विकासासाठी जादा निधी मिळवून द्यावा याकरिता चर्चा करून निर्णय घ्यावा ...

कोल्हापूर : शहराचे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी, तसेच शहराच्या विकासासाठी जादा निधी मिळवून द्यावा याकरिता चर्चा करून निर्णय घ्यावा म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मी स्वत: दहा वेळा विनंती केली; पण त्यांनी अद्यापही प्रतिसाद दिलेला नाही. निधी मिळाला नसल्यामुळे शहरात विकासकामे झालेली नाहीत, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी येथे खंत बोलून दाखविली. अशीच खंत आमदार हसन मुश्रीफ यांनीही व्यक्त केली.कॉँग्रेस - राष्टÑवादी आघाडीतील नगरसेवकांच्या बैठकीत ते बोलत होते. महापालिकेत सत्ता टिकविण्याचे काम आम्ही केले; मात्र राज्यात व देशात भाजपचे सरकार आले. त्यामुळे विकासकामे करण्यात खूपच अडचणी येत आहेत. . त्यामध्ये आम्ही आणलेल्या थेट पाईपलाईनचा प्रश्न महत्त्वाचा आहे. सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय हा प्रकल्प पूर्ण होणे अशक्य आहे. शहरातील रस्ते प्रचंड खराब झाले आहेत. त्याकरिता किमान २५ कोटींचा निधी राज्य सरकारने द्यावा, तसेच एलबीटीच्या वाढीव उत्पन्नाचा काही भाग पालिकेलाही मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहोत, असे पाटील यांनी सांगितले.आमदार मुश्रीफ यांनीही हाच धागा पकडून शहरातील रखडलेल्या कामांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याकरिता आम्ही विधानसभेच्या दारात उभे राहून आंदोलन केले; मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.पाणी काय फक्त कॉँग्रेस-राष्ट्रवादीलाथेट पाईपलाईन हे एक आमचे स्वप्न होते. योजना मंजूर झाल्यानंतर त्याचे काम गतीने होणे आवश्यक होते; पण सरकारचीच अनेक खाती अडचणी निर्माण करीत आहेत. ही योजना पूर्ण झाल्यावर केवळ कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रभागांतच पाणी मिळणार आहे आणि भाजप - ताराराणीच्या प्रभागांत मिळणार नाही असे काहीच नाही. सर्वांनाच पाणी मिळणार आहे, असे आमदार पाटील म्हणाले.