शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांना मदत करणाऱ्यांना थारा नाही

By admin | Updated: March 15, 2015 00:44 IST

‘राष्ट्रवादी-जनसुराज्य’ च्या बैठकीत निर्णय : उद्याच्या महापालिका सभेतील व्यूहरचना

 कोल्हापूर : सोळा हजार रुपयांची लाच स्वीकारून कोल्हापूरची तसेच राष्ट्रवादीची बदनामी करणाऱ्या महापौर तृप्ती माळवी यांना मदत करणाऱ्यांना पुढील काळात थारा दिला जाणार नाही, असा इशारा शनिवारी रात्री शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत देण्यात आला. तसेच जे नगरसेवक महापौरांना साथ देतील, त्यांना कोणत्याही प्रकारचा निधी दिला जाणार नाही, असाही इशारा यावेळी देण्यात आला. माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष आर. के. पोवार यांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री राष्ट्रवादी व जनसुराज्य आघाडीच्या नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत महापौरांचे लाच प्रकरण, त्याच्यापासून पक्षाची होत असलेली बदनामी, त्यांची राजीनामा न देण्याची भूमिका, महापौरांना महाडिक समर्थकांची होत असलेली मदत या सर्व गोष्टींचा ऊहापोह करण्यात आला. उपस्थित असलेल्या सर्वच नगरसेवकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यापुढे महापौर माळवी यांना मदत करणाऱ्या कोणाही नगरसेवकाला मदत करण्यात येऊ नये, अशी आग्रही भूमिका घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले की, कोल्हापूर शहरात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने केवळ विकासाची कामे केली आहेत. पक्षाने अनेक विकासाची कामे मंजूर करुन आणली आहेत. पारदर्शक कारभार केला. टीडीआर लाटला नाही की कोणाचे आरक्षण उठविले नाही. इतके चांगले काम केल्यानंतर महापौरांनी लाच स्वीकारल्याने पक्षाची बदनामी होत आहे. आमचा कोणाचाही त्यांना पाठिंबा नाही. त्यांना पदावरून हटविण्यासाठी सर्व प्रकारच्या कायदेशीर प्रक्रिया सुरू आहेत. त्यांना पक्षातून काढून टाकण्याचीही प्रक्रिया सुरू आहे, परंतु त्यांना गेल्या काही दिवसांपासून आमदार महादेवराव महाडिक यांचे काही कारभारी मदत करताना दिसत आहेत. आमची महाडिक यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांच्या कारभाऱ्यांना समजावून सांगावे. राष्ट्रवादीची बदनामी होत असल्याने आम्हालाही आता कठोर निर्णय घ्यावा लागेल. जर कोणी यापुढे महापौर माळवी यांना मदत करणार असेल, तर त्यांना थारा दिला जाणार नाही. महापौरांनी राजीनामा न दिल्यामुळे विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. लाच प्रकरणातून जरी पक्षाची बदनामी होत असली, तरी आम्ही जनतेसमोर जाऊन आमची बाजू मांडू. कारण आम्ही केवळ विकासाची कामे केली आहेत, असे मुश्रीफ यांनी सांगितले. मुश्रीफ यांनी कारभाऱ्यांना दिलेला इशारा हा अप्रत्यक्षपणे आमदार महाडिक यांनाच असल्याचे मानले जाते. (प्रतिनिधी)