शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २८४ शाळांत इंटरनेटच नाही; मग ऑनलाईन एज्युकेशन सुरू कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:26 IST

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्यावर्षी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण २,२७५ शाळांपैकी २८४ शाळांमध्ये इंटरनेटच नाही. ...

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्यावर्षी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण २,२७५ शाळांपैकी २८४ शाळांमध्ये इंटरनेटच नाही. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन एज्युकेशन सुरू कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या एकूण १९७७, तर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या २९८ शाळा आहेत. त्यात शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. त्यातील जिल्हा परिषदेच्या १७१, तर महापालिकेच्या ११३ शाळांमध्ये इंटरनेट सुविधा नाहीत. ‌उर्वरित शाळांमध्ये इंटरनेट, टॅब्लेट, ई-लर्निंग, एलसीडी प्रोजेक्टर आणि संगणक सुविधा आहे. इंटरनेट नसलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत ऑनलाईन पध्दतीनेच शिक्षण घ्यावे लागणार आहे. त्यामुळे सर्व शाळांमध्ये इंटरनेटची उपलब्धता असणे गरजेचे आहे.

पॉईंटर

जिल्ह्यातील एकूण शाळा : २२७५

महापालिकेच्या एकूण शाळा : २९८

शासकीय शाळा : ६५

अनुदानित शाळा : १४७

विनाअनुदानित शाळा : ८६

शिक्षकांना मोबाईलचा आधार

कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय पुढे आला. मात्र, त्यासाठीच्या साधनांची पुरेशी उपलब्धता नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण होत आहे. इंटरनेट नसलेल्या शाळांमध्ये शिक्षक हे स्वत:च्या मोबाईल, स्मार्टफोनव्दारे शिक्षण देत आहेत.

- मालुताई जाधव

कोरोनामुळे ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. मात्र, या स्वरूपातील शिक्षणाला काही मर्यादा आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आमच्या शाळेने कोरोनाचे नियम आणि शासन अटींचे पालन करून प्रत्यक्षात वर्ग सुरू केले आहेत.

- चंद्रकांत भोई

ऑनलाईन शिक्षण म्हणजे काय असते रे भाऊ

आमच्या गावात योग्य स्वरूपात इंटरनेट मिळत नाही. ऑनलाईन शिक्षण घेण्यात वारंवार अडथळा निर्माण होताे. त्यामुळे अशा पध्दतीने शिक्षण घेणे अडचणीचे ठरत आहे.

- प्रसाद हेंबाडे

ऑनलाईन शिक्षणामुळे मी शिक्षण घेत आहे, असे वाटले नाही. वर्गात शिकवलेले पटकन समजते. त्यामुळे आता वर्ग सुरू झाल्याने खूप चांगले झाले आहे.

-सिध्दिका सुतार.

शिक्षणाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात इंटरनेट उपलब्ध असलेल्या प्राथमिक शाळांची संख्या चांगली आहे. ज्या शाळांमध्ये इंटरनेट सुविधा नाही, तेथील शिक्षक हे स्व:खर्चातून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देत आहेत.

- एस. के. यादव, प्रशासन अधिकारी, प्राथमिक शिक्षण समिती.

120721\12kol_1_12072021_5.jpg

डमी (१२०७२०२१-कोल-स्टार ८९२ डमी)