शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

मंदिराच्या मूळ सौंदर्याला बाधा नको

By admin | Updated: June 10, 2016 00:51 IST

भाविकांचा विकास अपेक्षित : परंपरा, व्यवस्था यांचा विचार करून आराखडा हवा...

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा जनतेसमोर सादर होणार आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने मंदिराचाच नव्हे तर कोल्हापूर शहराचा विकास होणार आहे. तो होत असताना भक्त आणि कोल्हापूरचा रहिवासी म्हणून नागरिकांच्या काही अपेक्षा आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंदिराचा विकास आराखडा कसा असावा, यासंबंधी लोकभावनांची मांडणी आजपासून...!अन्य देवस्थानांप्रमाणे अंबाबाई मंदिराचा विकास झालाच पाहिजे. हे मंदिर अतिप्राचीन आणि सुरेख बांधणीचे आहे. त्यामध्ये प्रवेश केला की भाविकाला प्रसन्न शांततेची अनुभूती आली पाहिजे. मात्र येथील सौंदर्याला बाधा आणणाऱ्या अनेक गोष्टी परिसरात आहेत. अनावश्यक बॅरिकेटस, पूल, पाय धुण्याच्या टाक्या, लटकत्या वायरी, देवस्थानच्या केबिन्स, अडगळीच्या वस्तू अशामुळे हे सौंदर्य लुप्त झाले आहे. त्या हटवून मंदिराचे मूळ सौंदर्य प्रकाशात यायला हवे. ओवऱ्यांतील दुकानांचे अन्यत्र पुनर्वसन करून परिसर मोकळा करावा. अन्य मंदिरांचाही विचार व्हावा. मंदिर हा असा केंद्रबिंदू आहे, ज्यावर अनेकांचा चरितार्थ आहे. विकास आराखड्यामुळे त्यांचे आयुष्य बाधित होणार नाही याची काळजी घेतली जावी. आत्ता फोट्रेस कंपनीने प्रत्यक्ष परिसराचा विचार न हा आराखडा बनविला आहे. कंपनीच्या लोकांनी कार्यालयात बसून आराखडे बनवायचे आणि प्रशासकीय यंत्रणेने त्यांना मान्यता द्यायची असे होऊ नये, अन्यथा विरोध नक्की. विरोधामुळे मंदिराचा विकास थांबायला नको. मंदिरातील परंपरा, व्यवस्था आणि भाविकांचा विचार करून त्यांना सामावून घेणारा विकास येथे अपेक्षित आहे. - अजित ठाणेकर (श्रीपूजक, नगरसेवक)दर्शनमंडप हवे का ?विद्यापीठ गेट येथे सात कोटी रु पये खर्चून साडेसातशे भाविक सामावतील असा दर्शन मंडप उभारणार आहेत. मात्र, खरंच याची आवश्यकता आहे का, याचा विचार व्हावा. गाभाऱ्यापर्यंत जाणारी रांग पूर्व दरवाजातून असून ती योग्य आहे. आरसीसी इमारत उभारून सौंदर्य बिघडविण्यापेक्षा पूर्व दरवाजा येथील इमारतींचा वापर दर्शन मंडप म्हणून केला जावा. येथेच प्रसाधनगृह व्हावे.कपिलतीर्थ मार्केटचा विचार व्हावाकपिलतीर्थ मार्केट येथे पहिल्या मजल्यावर पार्किंग आणि वरच्या मजल्यावर भाजी विक्रेते किंवा व्यावसायिकांचे पुनर्वसन करता येईल. शिवाय व्हीनस कॉर्नर येथील महापालिकेच्या जागेतही पार्किंगची सोय करून भाविकांना शटल सर्व्हिस देता येईल.