शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘गडहिंग्लज’करांच्या हिताविरूद्ध निर्णय नाही

By admin | Updated: April 12, 2017 00:18 IST

नगराध्यक्ष कोरी यांची ग्वाही : नगरपालिकेची बदनामी न करण्याचे आवाहन

गडहिंग्लज : रिंगरोड सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हस्तांतरित करण्यासंबंधीचा कोणताही ठराव झालेला नाही. त्यामुळे डी नोटीफिकेशनद्वारे नागरिकांवर अन्याय होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा खुलासा करतानाच आपल्या कारकीर्दीत शहरातील नागरिकांच्या हिताविरूद्ध कोणताही निर्णय होणार नाही, अशी ग्वाही नगराध्यक्ष प्रा. स्वाती कोरी यांनी सोमवारी दिली.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील राज्य महामार्गावरील दारू दुकाने बंद झाली आहेत. ती दुकाने पुन्हा सुरू होण्यासाठी डी. नोटीफिकेशनच्या हालचाली सुरू असल्याचा येथील नागरिकांचा आरोप होता. त्याला विरोध दर्शविण्यासाठी रिंग रोड परिसरातील नागरिक निवेदन घेऊन पालिकेत आले होते. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. मात्र, नागरिकांच्या हिताविरूद्ध कोणताही निर्णय घेतलेला नसतानाही झालेल्या घोषणाबाजीबाबत नगराध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.नगराध्यक्ष म्हणाल्या, २०१५ मध्ये रिंगरोडसंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याकडूनच सर्व्हे होऊन तो शासनाकडे सादर झाला आहे. त्याच्याशी पालिकेचा कोणताही संबंध नाही. शहराच्या हद्दीतील कडगाव आणि भडगाव रस्ता व गटारींची डागडुजी करता यावी यासाठी नागरिकांच्या तक्रारीमुळेच ते दोन्ही रस्ते ताब्यात देण्याची मागणी पालिकेने केली आहे. मात्र, त्याबाबतही अद्याप निर्णय झालेला नाही.हद्दवाढ कृती समितीचे प्रमुख डॉ. एम. एस. बेळगुद्री, मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, दत्ता देशपांडे व राजेंद्र पाटील यांनी नागरिकांची बाजू मांडली. त्यानंतर नगराध्यक्षांना निवेदन देण्यात आले. नागरिकांना विश्वासात न घेता रिंगरोडच्या मालकी हक्क हस्तांतरीत करण्यासंबंधीचा एकतर्फी कोणताही ठराव करू नये, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)कोणताही ठराव नाहीरिंगरोडचा ताबा ‘सार्वजनिक बांधकाम’कडे देण्यासंबंधीचा कोणताही ठराव झालेला नसतानाही डी नोटीफिकेशनद्वारे दारू दुकानदारांना पाठीशी घातले जात असल्याचा गैरसमज पसरवून पालिकेची व नगरसेवकांची सुरू असलेली बदनामी थांबवा, असे आवाहन नगराध्यक्ष प्रा. कोरी यांनी यावेळी केली.गडहिंग्लज येथे नगराध्यक्ष स्वाती कोरी यांना नागाप्पा कोल्हापुरे, बाळासाहेब हिरेमठ, डॉ. एम. एस. बेळगुद्री, दत्ता देशपांडे, राजेंद्र पाटील व नागेश चौगुले यांनी निवेदन दिले. यावेळी क्रांतीदेवी शिवणे, नाज खलिफा, राजेश बोरगावे व बसवराज खणगावे, आदी उपस्थित होते.