शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढ करावीच लागेल

By admin | Updated: March 8, 2016 01:00 IST

चंद्रकांतदादा : कोणती गावे घ्यावीत अन् घेऊ नये हाच वादाचा मुद्दा

कोल्हापूर : शहराची हद्दवाढ करावीच लागणार आहे. फक्त कोणती गावे घ्यावीत अन् कोणती घेऊ नयेत. दोन्ही एमआयडीसी घ्याव्यात की नको एवढा एकच मुद्दा वादाचा आहे; परंतु यासंदर्भात शहरी आणि ग्रामीण जनता यांच्यात संघर्ष होणार नाही याची खबरदारी बाळगून राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी येथे सांगितले. पालकमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून राज्यसरकार काही गावे व दोन एमआयडीसी वगळून हद्दवाढ करण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले. शासकीय विश्रामगृहावर झालेल्या दोन्ही बैठकीत पालकमंत्री पाटील यांनी आपली आणि सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, शहराची हद्दवाढ होणार यात कसलीच अडचण वाटत नाही. फक्त किती गावे घ्यावीत, एमआयडीसी घ्याव्यात की नकोत, हे मुद्दे चर्चेतून पुढे आले आहेत. पुणे, नाशिक, ठाणे, औरंगाबाद, सांगली या शहरांच्या हद्दवाढी दोन-चारवेळा झाल्या आहेत. मग कोल्हापूर शहराची हद्दवाढ का नको, अशी विचारणा नगरविकास विभागाने केली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात सहा-सात गावे वगळून का होईना हद्दवाढ करावीच लागेल. औद्योगिक वसाहती या ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका हद्दीत असू नयेत त्यासाठी स्वतंत्र टाउनशीप करण्याचा कायदा १९७२ मध्ये झाला आहे. त्यामुळे दोन्ही औद्योगिक अशी विनंती न्यायालयाला केली होती. त्यानुसार सोमवारी वसाहतीसाठी वेगळा विचार करावा लागणार आहे. दोन-तीन मुद्दे सोडले तर हद्दवाढ करण्यात अडचण नाही तरीही सर्वांना विश्वासात घेऊन संघर्ष होणार नाही याची खबरदारी घेत निर्णय घ्यावा लागणार आहे, असे पाटील यांनी सांगितले. शहरवासीयांचे नुकसान नको : नरवणकर दरम्यान, उच्च न्यायालयात दाखल झालेल्या हद्दवाढ जनहित याचिकेचे काम पाहिलेले अ‍ॅड. युवराज नरवणकर हे स्वत: पालकमंत्री पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी माहिती देताना सांगितले की, शहराच्या हद्दवाढीसाठी राज्य सरकारने आतापर्यंत कायदेशीर प्रक्रिया राबविलेली नाही. त्यामुळे आधी अधिसूचना काढा, त्यावर हरकती मागवा आणि मग हरकतींची छाननी करून योग्य निर्णय घ्या, अशी कायद्याची अपेक्षा आहे. राज्य सरकार हे कायदे मंडळ असते.त्यामुळे दोन्ही बाजू ऐकून घेऊन निर्णय घ्यावा, असे अपेक्षित नाही. सरकार सारासार विचार करून निर्णय घेऊ शकते. तो त्यांचा अधिकार आहे. दुर्दैवाने हा लढा ‘कोल्हापूर विरुद्ध कोल्हापूर’ असा सुरू असून त्यात शहराचे नुकसान होऊ नये, अशी अपेक्षाही अ‍ॅड. नरवणकर यांनी व्यक्त केली. मिरवणुकीवर निर्णय नाहीहद्दवाढीचा निर्णय घ्या, तुमची हत्तीवरून मिरवणूक काढतो, असे हद्दवाढ कृती समितीने, तर हद्दवाढीचा प्रस्ताव रद्द करा, आम्हीही तुमची उंटावरून मिरवणूक काढतो, असे विरोधी कृती समितीने पालकमंत्र्यांना सांगितले. त्याचा संदर्भ देत पालकमंत्री पाटील म्हणाले की, माझी हत्तीवरून मिरवणूक काढली जाणार आहे किंवा नाही यावर निर्णय होणार नाही. त्यामुळे कोणाच्या हत्तीवरून जायचे की उंटावरून जायचे, हा माझ्या समोरचा प्रश्नच नाही. जो निर्णय होणार आहे, तो वास्तवाला अनुसरून होईल. अद्याप हद्दवाढीचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे आतापासूनच कोणी आंदोलन करू नये.काही गावे वगळून हद्दवाढ शहराची हद्दवाढ करताना पाच गावे आणि दोन एमआयडीसी वगळल्या जाऊन उर्वरित गावांना शहर हद्दीत समाविष्ट करून घेतली जाण्याची शक्यता पालकमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे ठळक झाली आहे. \