शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीशच नाहीत; कोल्हापुरात महसूल न्यायाधीकरणची पक्षकारांना तारीख पे तारीख

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: December 7, 2023 16:18 IST

साडेआठशेच्यावर प्रलंबित प्रकरणे न्यायाच्या प्रतीक्षेत

इंदुमती गणेशकोल्हापूर : कुळ वहिवाटीची प्रकरणे निकाली काढणाऱ्या महाराष्ट्र महसूल न्यायाधीकरण विभागाकडून पक्षकारांना गेल्या वर्षभरापासून तारीख पे तारीख दिली जात आहे. न्यायाधीशांची मुदत संपून वर्ष झाले तरी नवी नियुक्ती न झाल्याने कोल्हापूर व सांगलीच्या पक्षकारांना वेळ, पैसा आणि श्रम घालवत दरवेळी पुण्याला जावे लागते. बरं तिथेही प्रकरण निकाली निघत नाही. साडेआठशेच्यावर प्रलंबित प्रकरणे इथे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील ताराराणी हॉलच्या मागील बाजूस महाराष्ट्र महसूल न्यायीकरणचे कार्यालय आहे. येथे कोल्हापूर व सांगली येथील कुळवहिवाटीची प्रकरणे दाखल होतात. तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांनी नाकारलेली प्रकरणे येथे चालवली जातात. न्यायाधीशांपुढे याची सुनावणी होऊन प्रकरणे निकाली काढली जातात. येथील निकाल मान्य नसेल तर पक्षकारांना उच्च न्यायालयात जावे लागते. पण इथेच निकाल लागला की पुढची उच्च न्यायालयाची प्रक्रिया वाचते. एवढे महत्त्व या विभागाचे असताना त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

न्यायाधीश आणि कर्मचारीही नाही

न्यायाधीश एम. एम. पोतदार हे ८ डिसेंबर २०२२ रोजी निवृत्त झाले. त्यांना मुदतवाढ मिळाली नाही, नवी नियुक्तीही झाली नाही, इथे एवढे प्रकरणे येत असताना या विभागाला स्वतंत्र आकृतिबंध नाही. महसूलचेच कर्मचारी येथे काम करतात. आता फक्त एक अव्वल कारकून आहे. एका क्लार्कला अतिरिक्त कार्यभार आहे. ते स्वत:चे टेबल सांभाळून हे काम करतात. शिपाई नाही.

एकही निर्णय नाही..इथे न्यायाधीश नसल्याने कोल्हापूर व सांगलीच्या पक्षकारांना नवीन प्रकरण दाखल करताना व प्रत्येक सुनावणीसाठी पुण्याला जावे लागते. कोल्हापूरसाठी फक्त गुरुवार व शुक्रवार दिला गेला आहे, त्यामुळे तिथे फक्त तारीख पे तारीखच मिळते. गेल्या वर्षभरात येथील एकाही प्रकरणाचा निकाल लागलेला नाही. सांगलीच्या नागरिकांसाठी तर हा प्रवास अजून दूरचा होतो.

१५ दिवसांचा लॉटइथे नियुक्ती होणाऱ्या न्यायाधीशांना १५ दिवस कोल्हापुरात व १५ दिवस पुण्यात कामकाज चालवावे लागते, त्यामुळे या पदावर नियुक्ती व्हायला कोणी इच्छुक नसते. न्यायाधीशांनी नेमके राहायचे कुठे, त्यांच्या कुटुंबीयांचा प्रश्न अशा अडचणी येतात.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालय