शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ४०८ गावांमध्ये बालसंरक्षण समित्याच नाहीत

By admin | Updated: April 23, 2015 00:41 IST

आदेशाला केराची टोपली : कक्ष माहितीच्या प्रतीक्षेत

सांगली : बालकांवर होत असलेले अत्याचार रोखण्याकरिता प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या ग्रामसभेत गाव बालसंरक्षण समितीचे गठण करण्याचे आदेश शासनाने दिले होते. मात्र जिल्ह्यातील ७०३ ग्रामपंचायतींपैकी केवळ २९५ गावातच या समितीचे गठण झाल्याची माहिती जिल्हा बालसंरक्षण कक्षाकडे आली आहे. उर्वरित ४०८ गावांमध्ये बालसंरक्षण समित्या गठित करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आल्याचे समोर आले आहे.शासनाच्या आदेशानुसार सर्वच ग्रामपंचायत व नगरपरिषदेत या समितीचे गठण होणे गरजेचे होते; मात्र तसे झाले नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे बालकांच्या संरक्षणाबाबत जिल्हा किती उदासीन आहे, याचा प्रत्यय येत आहे. या समितीच्या गठणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या होत्या. प्रत्येक ग्रामपंचायतीला लेखी आदेशही त्यांनी काढले होते; परंतु त्यांच्या सूचनांनाही केराची टोपली दाखविण्यात आल्याचे समोर आले आहे. शासनाच्यावतीने बालकांना संरक्षण मिळावे, बालमजुरी कमी व्हावी, याकरिता विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. शिवाय, तसे कायदेही तयार होत आहेत. मात्र, त्यांची अंमलबजावणी करण्याकरिता असलेल्या विभागांकडून त्याला बगल दिली जात असल्याने हे कायदे कुचकामी ठरत आहेत. कायदे करून बालकांच्या समस्या सुटणार नाहीत, हे लक्षात आल्यावर शासनाच्यावतीने ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत बालकांचे संरक्षण व्हावे, याकरिता गाव बालसंरक्षण समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला.शासनाच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या. यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश काढत प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या ग्रामसभेत गाव बालसंरक्षण समिती गठित करण्याच्या निर्णयाची माहिती सर्वांना दिली. त्या सूचना प्रशासकीय यंत्रणेद्वारे ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्या; मात्र त्या कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात अद्यापही बऱ्याच गावात या समितीचे गठण झाले नसल्याचे समोर येत आहे. तासगाव, वाळवा तालुक्यात शंभर टक्के गावामध्ये, तर मिरज तालुक्यातील तीन, जत ६०, शिराळा ४५ आणि कवठेमहांकाळ तालुक्यात २० गावांमध्ये बालसंरक्षण समिती गठीत आहेत. उर्वरित आटपाडी, मिरज, खानापूर, पलूस, कडेगाव या तालुक्यातील एकाही गावात बालसंरक्षण समिती गठित झाल्याचा अहवाल जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाला नाही. (प्रतिनिधी)गावपातळीवर सरपंच समितीचे अध्यक्षगावपातळीवर बाल संरक्षण समितीचे अध्यक्षपद सरपंचांकडे, तर सचिवपद अंगणवाडी सेविकेकडे आहे. याशिवाय पोलीसपाटील, आशा सेविका, प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, तीन स्थानिक सामाजिक प्रतिनिधी, वय वर्षे १२ ते १८ वयोगटातील मुलगा आणि मुलगी आदी दहाजण सदस्य आहेत. तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष तहसीलदार असून बालविकास प्रकल्प अधिकारी सदस्य सचिव आहेत. गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील एक प्रतिनिधी आणि गावपातळीवरील समित्यांमधून दोन प्रतिनिधी, अशा बाराजणांचा समितीत समावेश आहे.