शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
3
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
4
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
5
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
6
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
7
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
8
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
9
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
10
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
11
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
12
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
13
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
14
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
15
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
16
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
17
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
18
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
19
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
20
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...

कागल नगरपालिकेत आता वीस नगरसेवक

By admin | Updated: March 19, 2016 00:14 IST

निवडणूक आठ महिन्यांवर : लोकसंख्या, हद्दवाढ या घटकांचा विचार करून संख्या वाढविली

जहाँगीर शेख -- कागल  नगरपरिषदेची निवडणूक सात-आठ महिन्यांवर आली आहे. प्रशासनाकडून या निवडणुकीची तयारी झाली आहे. वाढलेली लोकसंख्या आणि हद्दवाढ या घटकांचा विचार करून प्रशासनाने १७ ऐवजी २0 नगरसेवक संख्या करण्याची शिफारस शासनाकडे केली आहे. त्यामुळे सभागृहात तीन नगरसेवक जादा दिसणार आहेत.साधारणत: २४ हजार लोकसंख्येच्या अनुषंगाने १७ नगरसेवक संख्या निश्चित झाली होती. आता ही लोकसंख्या ३५ हजारांच्या पुढे गेली आहे. २00९ मध्ये कागल नगरपरिषदेची हद्दवाढ होऊन पालिका हद्दीचा विस्तार झाला. त्याचप्रमाणे तेथील लोकसंख्याही नगरपालिका हद्दीत आली आहे. गेल्या १0 वर्षांत वसाहतीबरोबरच शहरात लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. सध्या नगरपालिकेत १७ नगरसेवक शहराचे प्रतिनिधित्व करतात. ११ डिसेंबर २0१६ पूर्वी नवीन नगराध्यक्ष निवड होणे अपेक्षित आहे. त्यामुळे नोव्हेंबर २0१६ मध्ये मतदान होणार आहे. त्यासाठी मतदारयादी पुनर्रचनेबरोबरच नगरसेवकांची संख्या निश्चित करून त्यानंतर प्रभाग रचना आरक्षण सोडत होणार आहे. गतनिवडणुकीत या प्रभागातून तीन आणि चार या प्रमाणात नगरसेवक निवडून दिले होते. यावेळी हा पॅटर्न बदलून एक प्रभाग एक नगरसेवक अशी रचना करण्याचा विचार शासन करीत आहे. त्यामुळे मतदारांवर व्यक्तिगत प्रभाव हा मुद्दा महत्त्वाचा ठरेल. १९ ते २0 नगरसेवक संख्या निश्चित झाल्यानंतर मग प्रभाग रचना करताना पालिका प्रशासनाचा कस लागणार आहे. कारण कागल शहराच्या हद्दवाढीत लिंगनूर दुमाला, पिंपळगाव खुर्द, व्हन्नूर, मौ. सांगाव, क. सांगाव या गावांच्या हद्दीपर्यंत नगरपालिका हद्द पोहोचली आहे. या ठिकाणच्या छोट्या वस्त्या, उपनगरे यांना प्रतिनिधित्व द्यावे लागणार आहे तर राजकीय गटांनाही कार्यकर्ते सांभाळताना १७ ही लोकसंख्या अपुरी पडत होती. दोन जागा वाढल्या तर तेवढीच सोय करता येणार आहे. शासनाकडून दोन की तीन जागा वाढवून येणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे.पडद्यामागून राजकीय हालचालीनगरपालिका निवडणुकीसाठी सात ते आठ महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय गट सावध हालचाली करीत आहेत, मात्र या हालचाली पडद्यामागील आहेत. प्रामुख्याने सत्ताधारी आमदार हसन मुश्रीफ गट आणि समरजितसिंह घाटगे यांचे ‘राजे गट’ यांच्याकडून या हालचाली सुरू आहेत. तर मंडलिक गट, संजय घाटगे गट या दोन्ही गटांकडे लक्ष ठेवून आहेत.