शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
5
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
6
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
7
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
8
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
9
'क्रिस्टल ब्लॅक पर्ल' रंगात होंडा अमेझ भारतात लॉन्च; नव्या लूकमध्ये दिसते आणखी धासू!
10
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
11
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
12
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
13
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
14
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
15
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
16
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
17
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
18
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
19
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
20
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स

...तेव्हा ‘आर. आर.’ कोठे होते?

By admin | Updated: September 18, 2014 00:36 IST

राजू शेट्टी यांचा पलटवार : राजकारणाचा धंदा करणाऱ्यांनी बोलू नये

कोल्हापूर : शरद पवार यांच्या चुकीच्या धोरणामुळे दूध अतिरिक्त होऊन शेतकऱ्यांना रस्त्यावर दूध ओतावे लागले, त्यावेळी आर. आर. पाटील कोठे होते? असा पलटवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने समाजकारण व राजकारण हे शेतकऱ्यांसाठी केले; पण ज्यांनी राजकारणाचा धंदा केला, त्यांनी आमच्यावर बोलू नये, अशी टीकाही शेट्टी यांनी पाटील यांच्यावर केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोल्हापुरातील प्रचार प्रारंभ सभेत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी खासदार शेट्टी यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्या टीकेला त्याच शब्दांत शेट्टी यांनी आज, बुधवारी उत्तर दिले. ‘युपीए’च्या काळात कांद्यावर निर्यातबंदी घातली नाही, असे म्हणणाऱ्या पवार यांचे साथीदार सप्टेंबर २०११ मध्ये पंतप्रधानांकडे कशासाठी गेले होते? आता शेतकऱ्यांच्या बाजूने गळा काढणाऱ्यांच्या हातात दहा वर्षे कृषी खाते असताना काय दिवे लावलेत, हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. गेल्या दहा वर्षांत जमले नाहीत ते निर्णय नरेंद्र मोदी यांनी तीन महिन्यांत घेतल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे. गेल्या दहा वर्षांत साखरेचे दर स्थिर ठेवून शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर दिल्याची वल्गना पवार करीत आहेत; पण हा दर कोणामुळे मिळाला हे शेतकऱ्यांना ज्ञात आहे. गेल्या दहा वर्षांत देशांतर्गत बाजारपेठेतील साठ्याचा चुकीचा अंदाज वर्तवून ती साखर बंदरात ठेवून कारखान्यांकडून कोणत्या दराने घेतली व ग्राहकांना कोणत्या दराने दिली, याचा खुलासा पहिल्यांदा शरद पवार यांनी करावा, असे आव्हानही खासदार शेट्टी यांनी दिले. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत येण्यामागे कोणाचा हात आहे? ‘वेफको’सह इतर कंपन्यांच्या कांदा खरेदी-विक्रीची माहिती उघडकीस येईल, त्यावेळी यातील खरे अर्थशास्त्र शेतकऱ्यांसमोर येईल. नाशिक येथील बाजार समित्यांवर कोणाचे वर्चस्व आहे? ‘नाफेड’ व ‘वेफको’च्या माध्यमातून शेतकऱ्यांची कशी फसवणूक होते? चांगदेवराव होळकर हे कोणत्या पक्षाचे आहेत? ‘नाफेड’चे अध्यक्ष असताना त्यांनी ‘वेफको’मध्ये कसा पैसा गुंतवला? याची उत्तरे शरद पवार यांनी द्यावीत. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने निर्यातबंदी केलेली नाही, किमान निर्यातमूल्य आकारले होते. त्याविरोधात थेट सरकारला इशारा देऊन केंद्रीय कृषिमंत्र्यांचे पुतळे आमच्या कार्यकर्त्यांनी जाळले, हे आर. आर. पाटील यांना दिसत नाही का? शरद पवार केंद्रीय मंत्री असताना दुग्धजन्य पदार्थांवर निर्यातबंदी घातल्याने संकलन बंद करण्याची वेळ दूध संघावर आली. कच्च्या साखरेच्या आयात-निर्यातीत घोटाळा झाला त्यावेळी आर. आर. पाटील कोठे होते? असा सवालही त्यांनी केला. (प्रतिनिधी)...तर शेतकरीही सुखाने दिवाळी खातीलपाच वर्षांत शेतकरी संघटनेने दिवाळी सुखाने खाऊ दिली नसल्याचे आर. आर. पाटील सांगत आहेत; पण चुकीच्या धोरणाने शेतकरी उद्ध्वस्त होत असेल तर तुम्हाला कदापि सुखाने झोपू देणार नाही. प्रश्न तसेच भिजत ठेवायचे आणि शेतकऱ्यांच्या नावाने ओरड करायची हे तुणतुणे बंद करा. साखर बोर्ड स्थापन केले; पण त्याचे कामकाज बंद आहे. आता कारखाने सुरू होतील. मग आम्ही गप्प बसायचे का? अशी विचारणा शेट्टी यांनी केली.