शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

...तर हे सरकार नालायक म्हणावे लागेल, कुडित्रे येथे सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 01:19 IST

कोल्हापूर : कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात असणाºया शेतकºयांच्या व्यथा आजही तशाच आहेत. सरकार बदलल्यावर शेतकºयांच्या व्यथा दूर होऊन त्यांनी पिकविलेल्या मालाला हमीभाव मिळेल असे वाटत होते;

ठळक मुद्देशेतकºयांनी पिकविलेल्या मालाला हमीभाव मिळत नसेल तर न्याय मागणाºया शेतकºयांसह जनतेप्रती सरकारमधील मंत्र्यांनी व नेत्यांनी अशी चुकीची भाषा का वापरावी,

कोल्हापूर : कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात असणाºया शेतकºयांच्या व्यथा आजही तशाच आहेत. सरकार बदलल्यावर शेतकºयांच्या व्यथा दूर होऊन त्यांनी पिकविलेल्या मालाला हमीभाव मिळेल असे वाटत होते; परंतु तसे होत नसेल तर हे सरकार नालायक म्हणावे लागेल, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला.कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, शिवसेना सचिव खा. विनायक राऊत, खा. गजानन किर्तीकर, ज्येष्ठ नेते दगडू सपकाळ, आमदार चंद्रदीप नरके आदी उपस्थित होते.उद्धव ठाकरे म्हणाले, दिवसा वीज नाही व रात्री नियमित असेल याची खात्री नाही, हे चित्र पूर्वीच्या सरकारप्रमाणे आताही आहे. त्यामुळे बदललेले काहीच नाही. अशा अडचणींतूनही शेतकºयांनी पिकविलेल्या मालाला हमीभाव मिळत नसेल तर हे सरकार नालायक म्हणावे लागेल.शेतकºयांसह जनतेचे प्रश्न समजावून घेण्यासाठी आपण आजपासून राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. सरकारवर टीका करणे हा उद्देश नाही तर या सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली असून त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण झाल्या की नाही? तसेच नुसत्याच केलेल्या घोषणा प्रत्यक्षात उतरल्या की नाही? हे पाहण्यासाठी आपण लोकांसमोर जात आहे. शेतकºयांकडून त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांच्याकडून निवेदनही स्वीकारत आहे. ही निवेदने मी उशाला घेऊन झोपणार नाही तर आवश्यकता वाटल्यास या सर्वांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांनाही भेटू.उमेदवार बघून विधान परिषदेबाबत निर्णय घेऊमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेवर निवडणूक लागली आहे. त्यात भाजपने शिवसेनेकडे सहकार्य मागितले आहे. याबाबत विचारणा केली असता भाजपकडून उभा राहणार उमेदवार पाहूनच मदत करायची की नाही? याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगून शिवसेना कुणाशी बांधील नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्र्यांनी आवर घातला नाही तर दरोडेखोरी वाढेलसांगली येथे घडलेली अमानुष घटना गंभीर आहे. पोलिसांकडूनच पोलिसांची बदनामी करण्याची कृती होत असेल तर ते थांबविण्याची जबाबदारी या खात्याचे मंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांची आहे. त्यांनी याला वेळीच आवर घातला नाही तर दरोडेखोरी सुरू होऊन प्रामाणिक पोलिसांवर अन्याय होईल, असे ठाकरे यांनी सांगितले.भाजप नेत्यांनी चुकीची भाषा का वापरावी?डांबराचा खर्च अर्धा दाखवा, खड्डे भरले नाही तर आभाळ कोसळेल काय? अशी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची वक्तव्ये तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्याकडून ऊस आंदोलनात तेल ओतून रस्त्यावर उतरणाºया शेतकºयांच्या पायात गोळ्या घालाव्यात, असे केलेले बेजबाबदार वक्तव्य हे योग्य नाही. न्याय मागणाºया शेतकºयांसह जनतेप्रती सरकारमधील मंत्र्यांनी व नेत्यांनी अशी चुकीची भाषा का वापरावी, अशी विचारणाही ठाकरे यांनी केली.मराठा आरक्षण, राणे, मंत्रिपद विषयाला बगलमंत्रिमंडळात नारायण राणे यांच्या समावेशाबाबतच्या प्रश्नावर हा त्यांच्या जीव-मरणाचा प्रश्न असून मला त्याच्यापेक्षा शेतकºयांचा प्रश्न महत्त्वाचा आहे, असे सांगून त्याला ठाकरे यांनी बगल दिली तर मराठा आरक्षणाबाबत आपण यापूर्वीच भूमिका स्पष्ट केल्याचे सांगून त्यावर अधिक बोलणे टाळत कोल्हापूरच्या आमदारांना मंत्रिपद मिळणार का? या प्रश्नावरही हसतच त्यांनी कोल्हापूरला एक पालकमंत्री दिला असताना इतर मंत्री कशाला? अशी कोटीही त्यांनी केली.