शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरात मोबाईल सर्व्हिस सेंटरमध्ये चोरी

By admin | Updated: July 11, 2017 18:29 IST

रोकडसह दोन लाखांचा मुद्देमाल लंपास : शाहूपुरी पाच बंगला परिसरातील घटना

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. ११ : शाहुपूरी पाच बंगला परिसरातील अनंत टॉवर्समधील मोबाईल विक्री-दुरुस्ती करणाऱ्या सर्व्हिस सेंटर कार्यालयाच्या खिडकीचे गज वाकवून चोरट्याने रोख रक्कमेसह दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले. अधिक माहिती अशी, शाहुपूरी पाच बंगला परिसरात अनंत टॉवर्स कॉम्प्लेक्स आहे. येथील पहिल्या मजल्यावर गाळा नं. १३-१४ मध्ये बी-२ एक्स सर्व्हीस सलुशन इंडीया कंपनीचे सर्व्हीस सेंटर आहे. याठिकाणी मोबाईल विक्री व दुरुस्त केले जातात. निखिल राजाराम कुमठेकर (वय ३९, रा. दिप्ती पार्क शाहूपुरी) हे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी सात वाजता ते कार्यालय बंद करुन घरी गेले. मंगळवारी सकाळी कर्मचारी सतिश बोरकर हे कार्यालयात आले. आतमध्ये पाहतात तर साहित्य विस्कटलेले होते. कॅश कॉन्टरमधील ३० हजार रुपये, आयफोन, हेडफोन, चार्जर, मोबाईल आदी साहित्य गायब असल्याचे दिसून आले. आजूबाजूला पाहीले असता दरवाजाच्या शेजारी असलेल्या खिडकीचे लोखंडी गज वाकलेले दिसून आले. सहा इंच जागेतून चोरट्याने आत प्रवेश करुन चोरी केल्याचे निष्पन्न झाले. याबाबत त्यांनी व्यवस्थापक कुमटेकर यांना फोनवरुन कळविले. त्यांनी शाहूपुरी पोलीसांना वर्दी दिली. पोलीस निरीक्षक प्रविण चौगुले यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. श्वानाद्वारे चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला असता ते जागीच घुटमळले. या परिसरातील ही तिसरी घरफोडी आहे. खिडक्यांचे गज वाकवून चोरी करणारा चोरटा अद्यापही पोलीसांच्या हाती लागलेला नाही. गेल्या दोन-तीन वर्षापासून हा चोरट्याने शहरात धुमाकूळ घातला आहे. रुईकर कॉलनीतील बंगलाही अशाच पध्दतीने फोडून पाच लाखांचा ऐवज लंपास केला होता.

डिटेक्टर गायब

मोबाईल सर्व्हिस सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. चोरट्याने कॅमेऱ्यांची दिशा बदलली होती. तसेच चित्रिकरण एकत्र साठवून ठेवणारा डिटेक्टर मशिन त्याने गायब केला आहे. त्यामुळे चोरट्या हुशार व सराईत असल्याचा पोलीसांचा अंदाज आहे.