शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेच्या बळावर जनतेच्या मनावर राज्य करता येणार नाही - श्रीपतराव शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2022 23:30 IST

मुश्रीफांनी मन मोठं करायला हवं होतं, गडहिंग्लज कारखान्याच्या १२ संचालकांनी राजीनामे देण्यापूर्वी कोल्हापूरच्या विश्रामगृहात मुश्रीफ यांची भेट होती

गडहिंग्लज : जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या भणंग माणसामुळे दिल्लीच्या सत्तेचा सोपान उलटल्याचा इतिहास आहे.त्यामुळे सत्तेच्या बळावर जनतेच्या मनावर राज्य करता येते,असे कुणी समजू नये. महाराष्ट्रातील मोठ्या ग्रामविकास खात्याचे मोठे मंत्री हसन मुश्रीफ यांनी मन मोठं करायला हवं होत. दोन्ही बाजू ऐकून निर्णय दयायला हवा होता.परंतु,त्यांनी एकाच बाजूचे ऐकले.'त्या' लोकांच्या मतावरच ते निवडून येणार असतील तर त्यांना माझा कोपऱ्यापासून दंडवत आहे,असा इशारा गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जनता दलाचे माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी शनिवारी दिला.

गडहिंग्लज कारखान्याच्या १२ संचालकांनी राजीनामे देण्यापूर्वी कोल्हापूरच्या विश्रामगृहात मुश्रीफ यांची भेट होती.त्याचा संदर्भ देत शिंदेनी थेट मुश्रीफांवरही तोफ डागली.शेतकरी, कामगारांतर्फे आयोजित रास्तारोकोप्रसंगी ते बोलत होते. शिंदे म्हणाले,'त्या' संचालकांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर आपणही आठवडयापूर्वी मुश्रीफांना भेटलो होतो.'त्यांना' समजावून सांगा आणि विषय संपवा अशी विनंती केली होती.दोन्ही बाजूच्या संचालकांची एकत्र बैठक घेऊन निर्णय घेऊया, असे मुश्रीफांनी सांगितले होते. त्यांच्या सूचनेनुसारच 'त्या' संचालकांशी आपणही चर्चा केली होती.परंतु,त्यांनी केवळ त्यांचेच ऐकले.त्यांनी आम्हांलाही बोलवून घेऊन आमच्याशी चर्चा करून निर्णय द्यायला हवा होता.परंतु,त्यांनी केवळ त्यांचेच ऐकले,असा आरोपही शिंदे यांनी केला. पदरमोड करून आम्ही कारखाना सुरू केला.

त्यावेळी आमच्याबरोबर असणाऱ्या प्रकाश चव्हाणांनीही आमची बाजू सोडली,त्याचा जाब लोकच त्यांना विचारतील. सुतगिरणी, सोयाप्रकल्प, शिवाजी बँक, प्रकाश नागरी पतसंस्था या संस्थाचं काय झालं ? असा सवालही त्यांनी केला.डेक्कन अॅग्रोमध्ये शेतकरी व कामगारांची फसवणूक करणारे डॉ. शहापूरकरही लबाड आहेत.त्यांच्याविरूध्द बदनामीचा दावा दाखल करणार आहोत,असा इशाराही त्यांनी दिला.