शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणादायी पुतळ्याला ९७ वर्षे पूर्ण, देशातील पहिले स्मारक

By संदीप आडनाईक | Updated: April 12, 2024 12:24 IST

संदीप आडनाईक कोल्हापूर : कोल्हापूरची शान असलेला दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्णाकृती भव्य पुतळा आज, शुक्रवार, ...

संदीप आडनाईककोल्हापूर : कोल्हापूरची शान असलेला दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्णाकृती भव्य पुतळा आज, शुक्रवार, दि. १२ एप्रिल २०२४ रोजी ९७ वर्षे पूर्ण करत असून, शताब्दी वर्षात पदार्पण करत आहे. कोल्हापूरच्या जनतेची प्रेरणा असलेला हा दसरा चौक आणि शाहू महाराजांचा पुतळा स्वाभिमानाच्या खुणा जपतो आहे. राज्य सरकारने २०२२ मध्ये स्मृतिशताब्दी वर्ष साजरे केले आहे. दसरा चौकातील या पुतळ्यासमोर दरवर्षी जयंतीनिमित्ताने शाहूप्रेमी तसेच केंद्रीय आणि राज्यातील मंत्री जेव्हा जेव्हा कोल्हापुरात येतात तेव्हा तेव्हा या पुतळ्यासमोर नतमस्तक होत असतात. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कसबा बावडा येथील लक्ष्मीविलास पॅलेस येथे झाला आणि निधन ६ मे १९२२ रोजी झाले. त्यामुळे या पुतळ्याच्या रूपाने त्यांचे देशातील पहिले प्रत्यक्ष स्मारक उभारण्याचे काम त्यांचे थोरले कर्तबगार चिरंजीव राजाराम महाराज यांच्यामुळे झाले. या पुतळ्यासाठी शाहूप्रेमींनी लोकवर्गणीतून एक लाख ४० हजार ७०० रुपये जमा केले होते. हा ब्राँझचा पुतळा मुंबईचे प्रसिद्ध शिल्पकार गणपतराव म्हात्रे यांनी तयार केला आहे. यासाठी ७५ हजारांवर खर्च झाला. पुतळ्याची उंची साडेआठ फूट असून, मस्तकावर मंदील आणि अंगात मराठेशाहीचा पायघोळ अंगरखा आहे. उजव्या हातात तलवार असून, दुसरा हात झग्यामध्ये आहे. मुंबईत तयार झालेला हा पुतळा रेल्वेने कोल्हापुरात आणला. रेल्वे स्थानकापासून दसरा चौकापर्यंत वाजत-गाजत मिरवणूक निघाली. तत्कालीन मुंबई प्रांताचे गव्हर्नर लेस्ली विल्सन यांच्या हस्ते याचे अनावरण झाले.जन्मदिनांकाचा वादशाहू महाराजांचा जन्मदिनांकाचा वादही पूर्वी गाजला होता. पुतळ्याचे अनावरण झाले तेव्हा शिलालेखावर जुलै असा उल्लेख आहे. महाराजांचा जन्मदिवस २६ जून १८७४ असल्याचे अनेक पुरावे इतिहासकारांनी मान्य केले आहेत.

दसरा चौकातील शाहू महाराजांचा पुतळा तीन वर्षांत शताब्दी वर्षात पदार्पण करेल. हा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा केला पाहिजे. हा देशातील पहिलाच पुतळा आहे. संसदेसह देशभरातील अनेक पुतळ्यांचे हा पुतळा मॉडेल आहे. शाहूंची चेहरेपट्टी, रुबाब, राजेशाही व्यक्तिमत्व या पुतळ्यामुळेच सर्वसामान्य जनतेच्या हृदयात विराजमान आहे. शाहू महाराजांना ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले होते, त्यांनी तो घडविलेला आहे. तो वास्तवबोधी पुतळा आहे. या पुतळ्याच्या कोनशिलेवर असलेली तारीख चुकीची असली तरी त्यानंतर समिती नेमून राज्य सरकारने जून ही तारीख मान्य केली आहे. -डॉ. जयसिंगराव पवार, इतिहास संशोधक 

शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे स्मारक म्हणून दसरा चौकातील या दर्शनी भागातील पुतळ्याकडे पाहिले जाते. तत्कालीन गव्हर्नर त्यावेळी तीन दिवस दौऱ्यावर होते. सामाजिक समतेचा संदेश प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या पुतळ्यांमधून दिला गेला आहे. ज्या चौपाळ्याच्या माळावर हा पुतळा उभारला तेव्हा पुतळ्यामागे घोड्याची पागा होती, सभोवती मराठा, जैन, लिंगायत, कायस्थ प्रभू, मुस्लीम बोर्डिंग उभारले होते. १९०१ मध्ये नंतर सीपीआरची इमारत उभारण्यात आली. -डॉ. विलास पोवार, इतिहास संशोधक

टॅग्स :kolhapurकोल्हापूर