शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

गाजलेल्या निवडणुका : श्रीपतराव बोंद्रे-मारुतीराव खाडे यांच्यातील लढत संस्मरणीय, निवडणुकीत एक-दोनच सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 16:19 IST

वर्गणी काढून खाडेंना केले उभे

कोल्हापूर : सांगरुळ विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतरच्या दुसऱ्या म्हणजेच १९८० च्या निवडणुकीत विद्यमान आमदार श्रीपतराव बोंद्रे (दादा) व मारुतीराव खाडे (बाबा) यांच्यात काटा लढत झाली होती. या लढतीत गोविंदराव कलिकते (साहेब) यांनी रंगत आणली होती. तिरंगी लढतीचा फटका खाडे यांना बसला आणि त्यांचा अवघ्या ३६६३ मतांनी पराभव झाला. बोंद्रे यांच्याविरोधात आव्हान निर्माण करून दिलेल्या निकराच्या झुंजीची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली होती.महाराष्ट्रात १९७८ ला विधानसभा मतदारसंघांची पुर्नरचना झाली आणि ‘करवीर’ व ‘राधानगरी’तील गावांचा समावेश करून ‘सांगरुळ’ मतदारसंघ अस्तित्वात आला. येथून पहिल्या निवडणुकीत श्रीपतराव बोंद्रे व गोविंदराव कलिकते यांच्यात सामना झाला. बोंद्रे यांनी ९८३९ मतांनी कलिकते यांचा पराभव केला. त्यानंतर दोनच वर्षांत १९८० ला मध्यावधी निवडणुका लागल्या. यावेळी काँग्रेस (अर्स)कडून श्रीपतराव बोंद्रे, काँग्रेस (इंदिरा)कडून मारुतीराव खाडे तर ‘शेकाप’कडून गोविंदराव कलिकते अशी तिरंगी लढत झाली होती. श्रीपतराव बोंद्रे यांचे राजकीय वजन अधिक होते. त्या तुलनेत मारुतीराव खाडे साधा व रांगडा माणूस, त्यामुळे ही लढत एकतर्फी होईल, असा अंदाज होता. पण खाडे यांच्या उमेदवारीनंतर करवीर तालुक्यातील त्यांच्या समर्थकांनी राबवलेली प्रचार यंत्रणा, कार्यकर्त्यांची एकजूट आणि सामान्य माणसांमधील सहानुभूतीच्या बळावर त्यांनी निकराची झुंज दिली. या लढतीत त्यांचा अवघ्या ३६६३ मतांनी पराभव झाला. गोविंदराव कलिकते हे थांबून एकास एक लढत झाली असती तर चित्र वेगळे दिसले असते, असे त्यावेळी प्रचारात सक्रिय असणारे आजही सांगतात.वर्गणी काढून खाडेंना केले उभेमारुतीराव खाडे यांचे सांगरुळ परिसरासाठी खूप मोठे योगदान होते. त्यांनी निवडणुकीला उभे राहावे, यासाठी लोकांनी ५० रुपयांपासून १ हजारांपर्यंत वर्गणी काढून त्यांना दिली होती. गोरगरीब कार्यकर्ता स्वत:ची भाकरी बांधून महिना महिनाभर प्रचारासाठी घरापासून लांब असायचा.

अखंड निवडणुकीत एक-दोनच सभात्यावेळी प्रचाराची हायटेक साधने नसायची. उमेदवारांची आर्थिक स्थितीही जेमतेमच असायची. त्यामुळे ना मोठ्या सभा, ना शक्तिप्रदर्शन, ट्रक, ट्रॅक्टर, सायकलवरून प्रचार यंत्रणा राबवली जात होती. खासदार, मंत्र्यांच्याच सभा अन्यथा थेट गाठीभेटींवरच प्रचाराचा भर असायचा.दृष्टीक्षेपात १९८० ची लढत..

  • एकूण मतदान : १ लाख ४ हजार ३५९
  • झालेले मतदान : ८१ हजार ७९६
  • टक्केवारी : ७८.७४ टक्के
  • श्रीपतराव बोंद्रे : २९ हजार ८७९ (३६.५३ टक्के)
  • मारुतीराव खाडे : २६ हजार २१६ ( ३२.०५ टक्के)
  • गोविंदराव कलिकते : २५ हजार ७०१ ( ३१.४२ टक्के)
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण