शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

ठाणेकर यांनीच बांधली अंबाबाईची पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 01:08 IST

कोल्हापूर : जिल्हा व पोलीस प्रशासनाने श्रीपूजक अजित व बाबूराव ठाणेकर यांना अंबाबाई मंदिरात बंदी केली असतानाही शनिवारी बाबूराव ठाणेकर यांनीच देवीची पूजा बांधली. त्यांना पोलिसांनीच संरक्षण दिले. या घटनेच्या निषेधार्थ आज, रविवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या दारात अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.ठाणेकर यांना ...

ठळक मुद्देपुजारी हटाव संघर्ष समिती संतप्त : आंदोलन करून आज ठाणेकरांना अडविणार; वाद पुन्हा चिघळणारआंदोलकांचा आवाज वाढल्यानंतर भुजबळांना जाग आली त्यांची भूमिका वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत.मंदिरात जावू नये हा निर्णय जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनीच दिला होता

कोल्हापूर : जिल्हा व पोलीस प्रशासनाने श्रीपूजक अजित व बाबूराव ठाणेकर यांना अंबाबाई मंदिरात बंदी केली असतानाही शनिवारी बाबूराव ठाणेकर यांनीच देवीची पूजा बांधली. त्यांना पोलिसांनीच संरक्षण दिले. या घटनेच्या निषेधार्थ आज, रविवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या दारात अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.ठाणेकर यांना मंदिरात सोडले तर आम्ही कायदा हातात घेऊ आणि होणाºया परिणामांना पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा समितीने दिला. सकाळी ११ वाजता होणाºया या आंदोलनास अंबाबाई भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समितीने केले आहे. त्यामुळे हा वाद पुन्हा चिघळण्याची चिन्हे आहेत.राज्य घटनेच्या चौदाव्या कलमानुसार आम्ही कोणत्याही व्यक्तीला मंदिरात जाण्यापासून, पूजा करण्यापासून रोखू शकत नाही, असे शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी सांगितले. अंबाबाईला घागरा- चोली नेसविलेले श्रीपूजक बाबूराव ठाणेकर व अजित ठाणेकर यांना जिल्हा व पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव पुजारी हटाओ मागणीचा निर्णय होईपर्यंत अलिखित काळासाठी अंबाबाई मंदिरात प्रवेश बंदी केली आहे. शुक्रवार (दि. ४) पासून बाबूराव ठाणेकर यांचा अंबाबाईच्या पूजेचा आठवडा सुरू झाला. या दिवशी त्यांनी पहाटेपासूनच देवीच्या गाभाºयात हजेरी लावली.मात्र दुपारी दोनच्या दरम्यान पोलिसांनी त्यांना मंदिराबाहेर घालविले. शनिवारी मात्र पोलिसांच्या बंदोबस्तातच बाबूराव ठाणेकर यांनी देवीचा अभिषेक करून पूजा बांधली. या घटनेचा जाब विचारण्यासाठी पुजारी हटाओ संघर्ष समितीचे पदाधिकारी शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांना भेटले.

आर. के. पोवार म्हणाले, ‘ज्या पुजाºयांना शुक्रवारी हात धरून बाहेर काढलात त्यालाच शनिवारी पोलीस संरक्षण देत मंदिरात नेण्यात आले. तुम्ही कोणाच्या दबावाखाली काम करताय का? बाबूराव आणि अजित ठाणेकर, योगेश जोशी यांच्यावर गुन्हा नोंद असताना त्यांची चौकशी केलेली नाही, कारवाई केलेली नाही. उद्या बाबूराव ठाणेकर यांना आत सोडलात तर त्यांचा बंदोबस्त आम्ही आमच्या पद्धतीने करू.’विजय देवणे म्हणाले, ‘ठाणेकर यांनी अंबाबाई मूर्तीची विटंबना केली आहे. पालकमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत तीन महिन्यांपर्यंत ठाणेकरांना मंदिरात जाऊ द्यायचे नाही, असा निर्णय झालेला असताना जाणीवपूर्वक त्यांना आत सोडण्यात आले. हा जनभावनेचा अवमान आहे. संजय पवार म्हणाले, ‘आम्ही आजवर अन्य कोणत्याही पुजाºयाला विरोध केलेला नाही. आमचा विरोध वाईट प्रवृत्तीला आहे. आमच्या भावनांशी खेळ करू नका, अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊ.’

अ‍ॅड. चारूलता चव्हाण यांनी ठाणेकर यांनी पोलीस संरक्षण घेण्याआधी त्याचे पैसे भरले का? अशी विचारणा केली. दिलीप देसाई म्हणाले, एखाद्या व्यक्तीवर गुन्हा नोंद असेल तर त्याला त्याची शिक्षा केली जाते. हद्दपार केले जाते. बाबूराव ठाणेकर यांनीही अंबाबाईच्या मूर्तीला घागरा-चोली नेसवून गंभीर स्वरूपाचा गुन्हाच केला आहे. तरी त्यांना मंदिर प्रवेश करू दिला गेला. महत्त्वाचे म्हणजे त्यांना पोलीस संरक्षणही का देण्यात आले?कायद्यानुसार आम्हांला त्यांचा मंदिर प्रवेश रोखता येत नसल्याची असमर्थतता पोलिस प्रशासनाने व्यक्त केल्यावर संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी आज, रविवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. ठाणेकर यांना जर मंदिर प्रवेश करू दिला तर आम्ही त्यांचा बंदोबस्त करू, असा इशाराही देण्यात आला. यावेळी माजी आमदार सुरेश साळोखे, डॉ. सुभाष देसाई, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक, बाबा पार्टे, आनंद माने, शरद तांबट, आदी उपस्थित होते.जिल्हा प्रशासनाचा आदेश धाब्यावरदिलीप देसाई म्हणाले,‘मंदिरात जाऊन आम्हीही गोंधळ घालू शकतो; पण पालकमंत्री यांच्या सांगण्यावरून त्यांचा आदर करून गप्प बसलो आहोत. कायदा-सुव्यवस्थेचे पालन आम्हीच करायचे आणि पुजाºयांनी मात्र पालकमंत्र्यांना, जिल्हाधिकाºयांना किंवा पोलीस अधीक्षकांनाही जुमानायचे नाही, असे का? हा जाणीवपूर्वक भक्तांना डिवचण्याचा प्रकार आहे. ठाणेकरांव्यतिरिक्त अन्य व्यक्ती पूजा करू शकली नसती का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यांनी मंदिरात जावू नये हा निर्णय जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनीच दिला होता. परंतू तरीही त्याचे पालन झालेले नाही.पोलिसांची भूमिका दुटप्पीवादाचा तोडगा निघेपर्यंत ठाणेकर पिता-पुत्रांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, याची खबरदारी पोलीस प्रशासन घेईल असे स्वत: जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार व पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी २३ जून रोजी सांगितले होते. त्यानुसार पोलीस प्रशासनाने शुक्रवारी ठाणेकर यांना मंदिरातून बाहेर जाण्यास भाग पाडले आणि शनिवारी पूजा बांधायला परवानगी दिली. ही त्यांची भूमिका वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत.कायदा व वास्तवकायद्याने कुणाही नागरिकाला मंदिर प्रवेशापासून रोखता येत नसले तरी जिल्हाधिकाºयांनी काही निर्णय घेतला असेल तर त्याचे पालन होणे आवश्यक होते. वाद चिघळावा असाच पोलीस व जिल्हा प्रशासनाचा हा व्यवहार आहे. पोलीस उपअधीक्षक आज कायदा सांगत होते मग त्यांचेच वरिष्ठ असलेल्या पोलीस अधीक्षकांनी जेव्हा ही बंदी जाहीर केली तेव्हा त्यांना कायद्याची आठवण का झाली नाही अशी विचारणा समितीने केली आहे.भुजबळांना लागली डुलकीसंघर्ष समितीचे पदाधिकारी पोलीस उपअधीक्षकांना जाब विचारत असताना तेथे उपस्थित असलेले जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक निशिकांत भुजबळ यांना डुलकी लागली. डॉ. अमृतकर यांनी ‘पोलीस ठाण्याचे निरीक्षक निशिकांत भुजबळ हे तिथे उपस्थित असतात,’ असे पदाधिकाºयांना सांगितल्याचेही त्यांच्या लक्षात आले नाही. आंदोलकांचा आवाज वाढल्यानंतर भुजबळांना जाग आली. तोपर्यंत समितीतील काहीजणांनी त्यांना डुलकी लागलेले छायाचित्र मोबाईलमध्ये टिपले.