शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रोद्योग धोरण घोषित करावे

By admin | Updated: March 7, 2016 01:16 IST

विनय महाजन : यंत्रमागधारक जागृती संघटनेची अपेक्षा

इचलकरंजी : देशामध्ये शेतीनंतर रोजगार देणारा वस्त्रोद्योग व्यवसाय आहे. या व्यवसायातून सुलभ रोजगाराबरोबरच परकीय चलनही मोठ्या प्रमाणावर मिळते. मात्र, वस्त्रोद्योगाविषयी धोरण आखण्यामध्ये केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारांकडून प्रयत्नच होत नाहीत, अशी टीका येथील यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी केली आहे. रोजगाराभिमुख असलेला हा उद्योग पाहता केंद्र व राज्य सरकारने वस्त्रोद्योग धोरण ताबडतोब जाहीर करावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.देशामध्ये आणि राज्यामध्ये भाजपप्रणीत सरकार सत्तेवर येऊन एक वर्षाहून अधिक कालावधी गेला. तसेच केंद्र सरकारने नुकताच वार्षिक अर्थसंकल्प जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये वस्त्रोद्योगाचा किरकोळ उल्लेख वगळता त्याबाबत कोणतीही दखल घेतलेली नाही. वस्त्रोद्योगाचे अत्याधुनिकीकरण केल्यास कापड निर्यात करून मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळण्याची शक्यता असतानासुद्धा वस्त्रोद्योगासाठी असलेल्या टफ्स (तांत्रिक उन्नयन योजना) अंतर्गत पूर्वी तीस टक्के असलेले अनुदान या सरकारने केवळ दहा टक्क्यांवर आणले आहे.कापडाची निर्यात व्हावी, यासाठी आणि सुताचे दर स्थिर व्हावेत, म्हणून योग्य ती उपाययोजना सरकार करेल, अशी अपेक्षा होती. त्याचबरोबर राज्यामध्ये प्रत्येक दोन महिन्याला यंत्रमागाच्या वीज दराची बैठक होते. मात्र, त्यातून कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने यंत्रमागाला सवलतीचा वीज दर मिळतच नाही. विशेष म्हणजे वस्त्रोद्योगाची कोणतीही कल्पना नसलेल्या व्यक्तीकडे वस्त्रोद्योग मंत्रालयाची जबाबदारी आहे, असा आरोप करीत महाजन पुढे म्हणतात, राज्यातील एक कोटीहून अधिक जनता वस्त्रोद्योगावर अवलंबून असल्यामुळे याशिवाय मराठवाडा व विदर्भातील कापूस पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची रोजी-रोटीचीसुद्धा याच उद्योगावर भिस्त असल्याने वस्त्रोद्योग धोरण लवकरच जाहीर करावे आणि वस्त्रोद्योगाची जाण असलेली व्यक्ती मंत्रिपदावर नियुक्ती करावी, अशीही मागणी शेवटी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)