शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

मंदीसह विविध प्रश्नांत वस्त्रोद्योग गुरफटला

By admin | Updated: February 14, 2017 23:50 IST

नवसंजीवनीची अत्यावश्यकता : वस्त्रोद्योगाच्या भीषण परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज; मुख्यमंत्र्यांचे आश्वासनाकडे दुर्लक्ष

अतुल आंबी -- इचलकरंजी --वस्त्रोद्योगातील मंदी, सुताचे अवाढव्य वाढलेले दर, वीजदराचा खेळखंडोबा आणि मजुरीवाढीचा प्रश्न यामध्ये वस्त्रोद्योग गुरफटला गेला आहे. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत शहरातील यंत्रमागाची चाके बंद पडू देणार नाही, अशी घोषणा केली होती. या घोषणेने यंत्रमाग व्यवसाय मोडून पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तर साधे यंत्रमागधारक अत्यंत बिकट परिस्थितीतून जात आहेत. त्यामुळे हा घटक मार्च एंडिंगच्या हिशेबात कर्जबाजारीपणाच्या विळख्यात सापडला जाऊन अनेकांचे उद्योग मोडून पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सरकारने वस्त्रोद्योगाच्या भीषण परिस्थितीकडे गांभीर्याने व डोळसपणे पाहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.केंद्र व राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर आपण पर्यटन व वस्त्रोद्योग याला विशेष महत्त्व देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावेळेपासून वस्त्रोद्योगाला काही तरी विशेष सवलतींचे पॅकेज मिळेल आणि या उद्योगाला झळाळी मिळून ‘अच्छे दिन’ येतील, अशी आशा लावून बसलेल्या या उद्योगातील सर्वच घटकांना घोर निराशेला सामोरे जावे लागले आहे. त्यात ‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणीप्रमाणे अतिशय तीव्र मंदीचा सामना वस्त्रोद्योगाला गत दोन वर्षांपासून करावा लागत आहे. येथील यंत्रमाग व्यवसायातील विविध घटकांनी एकमेकाला सावरत दोन वर्षे उद्योग जेमतेम पद्धतीने ढकलत आणला. मात्र, या सहा महिन्यांत आणखीनच बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. आता वस्त्रोद्योग मोडून पडण्याच्या स्थितीकडे निघाला आहे. याला योग्य वेळी नवसंजीवनी मिळाली नाही, तर उद्योगाचे न भरून निघणारे नुकसान होणार आहे.या पार्श्वभूमीवर शहरातील विविध संघटनांच्यावतीने अनेक वेळा तीव्र आंदोलने झाली. उद्योग स्थिरावण्यासाठी ठोस अशी काहीच उपाययोजना झाली नाही.तीन महिन्यांपूर्वी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वस्त्रोद्योगाची चाके बंद पडू देणार नाही, अशी घोषणा केली होती. वस्त्रोद्योगासाठी उपाययोजना केल्या जातील, असेही सांगितले होते. मात्र, अद्याप यंत्रमाग व्यावसायिकांच्या हाती काहीच लागले नाही. त्यानंतर वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनीही वेगवेगळ्या घोषणा केल्या. त्यातूनही अद्याप काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे वस्त्रोद्योगाकडे अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचा नेमका उद्देश काय, असा प्रश्न यंत्रमाग व्यावसायिकांना पडला आहे.सुताची साठेबाजी रोखणार कोण ?सध्या कोणतेही ठोस कारण नसताना महिन्याभरात सुताचे दर अवाढव्य प्रमाणात वाढले आहेत. नफेखोरी व साठेबाजीमुळे ही सूत दरवाढ झाली असल्याचे आरोप व चर्चा यंत्रमाग व्यावसायिकांत सुरू आहे. सुताला कमोडीटी मार्केटमधून काढून जीवनावश्यक वस्तूंमध्ये त्याचा समावेश करावा, अशी मागणी येथील विविध संघटनांच्यावतीने गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, याबाबत प्रशासन व शासन यांच्याकडून काहीच हालचाल होत नाही. त्यामुळे दिवसातून चार-पाच वेळा सुताचे दर बदलतात.सूतगिरण्यांना मिळाले करोडोंचे पॅकेजवस्त्रोद्योगात मंदीची लाट पसरली असल्याने यंत्रमाग व्यावसायिकांना विविध सवलती देण्याची मागणी सुरू आहे. तसेच सूतगिरण्यांचीही परिस्थिती बिकट झाल्याने त्यांनाही स्थिरावण्यासाठी पॅकेजची आवश्यकता होती. यातील सूतगिरण्यांची मागणी शासनाने तत्काळ मान्य करीत त्यांना करोडो रुपयांचे पॅकेज मंजूर केले. त्यामुळे सूतगिरण्या, सूत व्यापारी, अधिकारी, सरकार असा काही विशेष ‘मार्ग’ आहे का? नसेल तर मग अन्य घटक अद्याप वंचित का? असे अनेक उलटसुलट प्रश्न उपस्थित होत आहेत.मुख्यमंत्री सभेत आणखीन काय घोषणा करणार?जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरालगत असलेल्या कोरोची (ता. हातकणंगले) येथील माळभागावर भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा गुरुवारी (दि. १६) आयोजित केली आहे. आता या सभेत मुख्यमंत्री आणखीन काही घोषणा करणार ? अशी उपहासात्मक चर्चा वस्त्रोद्योगातील विविध घटकांमध्ये सुरू आहे.