शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

दहा लाख शेतकºयांची बँक खाती बनावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कर्जमाफीत पारदर्शकता राहावी, यासाठी शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज मागविले आहेत. मागवलेली माहिती व शेतकºयांचा जुना आकडा पाहिला तर खरा शेतकरीच अर्ज दाखल करत आहेत. त्यामुळे राज्यात जवळपास दहा लाख शेतकºयांची बँक खाती बनावट आहेत, असा गौप्यस्फोट राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरात केला.महाअवयव दान पंधरवडा सांगता समारंभासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कर्जमाफीत पारदर्शकता राहावी, यासाठी शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज मागविले आहेत. मागवलेली माहिती व शेतकºयांचा जुना आकडा पाहिला तर खरा शेतकरीच अर्ज दाखल करत आहेत. त्यामुळे राज्यात जवळपास दहा लाख शेतकºयांची बँक खाती बनावट आहेत, असा गौप्यस्फोट राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरात केला.महाअवयव दान पंधरवडा सांगता समारंभासाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात मंत्री पाटील सोमवारी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.मंत्री पाटील म्हणाले, राज्यातील शेतकºयांना कर्जमुक्त करण्यासाठी भाजप सरकारने ऐतिहासिक कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्यात ८९ लाख शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो पण आतापर्यंत आलेले आॅनलाईन ७२ लाख अर्ज दाखल झाले आहेत. जो खरा शेतकरी आहे तोच अर्ज भरत असून इतर मंडळींच्या मनात शंका असल्याने ते अर्ज भरण्यापासून लांब राहिले आहेत.ही आकडेवारी पाहता राज्यात सुमारे १० लाख शेतकºयांची खाती बनावट असल्याचे स्पष्ट होते. आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शुक्रवार (दि. १५)पर्यंत मुदत असून त्यानंतर पंधरा दिवसांत नेमलेली समिती अभ्यास करणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. आॅनलाईन अर्ज भरण्यास अजूनही काही ठिकाणी अडचणी येत आहेत, त्या लवकरच दूर करून शेतकºयांच्या खात्यावर थेट पैसे जमा केले जाणार असल्याने कोणालाही त्यामध्ये हस्तक्षेप करता येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या दसºया मेळाव्यासाठी आपण उपस्थित राहणार का? यावर बोलताना मंत्री पाटील म्हणाले, सदाभाऊंचे काम चांगले आहे आणि आपण चांगल्या कामाची नेहमी स्तुती करतो. त्यांना भाजपमध्ये का घेतले नाही, याबाबत आपण आताच काही बोलणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.‘देवस्थान’च्या जमिनी कुळांनाच देणारदेवस्थान समितीच्या जमिनीची मालकी कुळाकडे असल्याने त्यातून समितीला फारसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे या जमिनी संबंधित कुळांनाच रेडिरेकनर दराने देण्याचा निर्णय सरकार लवकरच घेणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. या जमिनींवरील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात काढून टाकणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.विमानसेवेबाबत आज बैठककोल्हापूरच्या विमान सेवेबाबत डेक्कन चार्टर एव्हिएशन कंपनीच्या अधिकाºयांशी आज, मंगळवारी दुपारी तीन वाजता मुंबईत बैठक होत असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. विमान सुरू व्हावे, यासाठी आता अंबाबाईलाच नवस करायला पाहिजे, अनेकदा विमान सुरू होण्याच्या तारखा येतात, पण ते प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत मी कोणताही नवा वायदा देणार नसल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगून टाकले. कोल्हापूर विमान सेवा अनेक वर्षांपासून बंद आहे. केंद्र सरकारच्या छोट्या शहरांसाठीच्या उड्डाण योजनेतून सप्टेंबर महिन्यात विमान सुरू होणार होते. याबाबत पत्रकारांनी पालकमंत्री पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, विमान सुरू करण्यासाठी होकार दिलेल्या डेक्कन चार्टर कंपनीसोबत आज, मंगळवारी चर्चा होणार आहे. विमान सेवा सुरू करायला कंपनी तयार आहे; पण वेळापत्रकाचा घोळ आहे. रात्रीची वेळ मिळाली आहे. ही वेळ चुकीची असल्याने आपण पुन्हा सकाळच्या सत्रात विमान सेवा सुरू व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहोत. विमान सेवा सुरू करणाºया कंपन्यांसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे ही सेवा नक्की सुरू होईल परंतु जोपर्यंत ती सुरू होत नाही तोपर्यंत आश्वासन मी देणार नाही.’