शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळा तालुक्यातील ग्रामपंचायतींची स्वच्छतेकडे पाठ

By admin | Updated: March 26, 2015 00:12 IST

अनेक गावे स्वच्छतेपासून वंचित : नागरिकांचे आरोग्य धोक्यात, वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज

किरण मस्कर - कोतोली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. हे अभियान गावोगावी करण्याचे प्रयत्न सुरू झाले असून, यापूर्वीही सरकारने गावांना स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण अद्यापही अनेक गावांची दिशा व दशा सुधारलेली दिसत नाही. ग्रामपंचायतीसह वरिष्ठ प्रशासनाने स्वच्छता अभियानाकडे लक्ष न दिल्यामुळेच तालुक्यातील अनेक गावे स्वच्छतेपासून वंचित आहेत.स्वच्छता अभियानाबाबत लोकप्रतिनिधींमध्येही उदासीनता दिसून येत असून, ज्या गावात स्वच्छतेकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आहे, तेथे घाणीचे साम्राज्य दिसून येते. आजही तालुक्यातील अनेक गावे घाणीच्या विळख्यात असून, नाल्यांमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढत आहे. यामुळे नागरिकांना डेंग्यू, मलेरिया या आजारांची लागण होण्याची शक्यता आहे. परिसरातील मटण विक्रेते हे दुकानातील घाण गावच्या बाहेर न टाकता त्या ठिकाणी अथवा जवळपास फेकली जाते. यामुळे गाव परिसर दूषित होण्यास कारणीभूत ठरतात. मात्र, या प्रकाराकडे कोणाचेही लक्ष नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छता अभियानांकडे लक्ष न दिल्यामुळे तालुक्यातील अनेक गावे स्वच्छतेपासून दुरावलेली आहेत. यामुळे दुर्गंधी पसरुन रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज आहे.अस्वच्छ ग्रामपंचायतीकोतोली, कोलोली, कसबा बोरगाव, तिरपण, घोटवडे, नणुंद्रे, करंजफेण, गोलिवडे, पोर्ले, आसुर्ले, माजगाव, पुनाळ, आळवे, उत्रे, निवडे, उंड्री, तेलवे, आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.‘स्वच्छ भारत’ ही योजना देशभरात सुरू आहे. याचे पालन नियमित संबंधित ग्रामपंचायतीने करणे गरजेचे आहे. या योजनेमध्ये ग्रामपंचायत प्रशासनासह संपूर्ण गावाचा सहभाग मोलाचा आहे.- बाजीराव उदाळे, सरपंच, ग्रामपंचायत वाघवे.पन्हाळा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी स्वच्छ गाव, सुंदर गाव, स्वच्छ घर, स्वच्छ दार अशा विविध योजना घेतल्या आहेत, पण काही ग्रामपंचायतींनी आजही त्या अमलात आणलेल्या नाहीत, तर काहींचा फक्त दिखावा आहे. लवकरच याची माहिती घेऊन निर्णय घेऊ.- सौ. सुनीता पाटील, सभापती, पंचायत समिती पन्हाळा.