पन्हाळ्याच्या पायथ्याला सोमवारपेठेत माजी सरपंच विठ्ठल पाटणकर यांच्या घराजवळ मध्यरात्री तीन बिबटे आल्याने संपूर्ण सोमवारपेठेत भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सोमवारपेठ छोट्या लोकसंख्येचे गाव सध्या तीव्र उन्हाळा असल्याने बहुतेक लोक आपल्या अंगणात, टेरेसवर झोपतात. माजी सरपंच विठ्ठल पाटणकर, त्यांच्या पत्नी वृषाली पाटणकर अंगणात कॉटवर झोपले होते. मध्यरात्रीनंतर तीन वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात उड्या मारल्याच्या आवाजाने विठ्ठल जागे झाले. बघतात तर समोर तब्बल तीन बिबटे समोर. त्यांनी आपल्या पत्नीलाही उठवले. दोघेही घाबरले आणि मोठ-मोठ्याने ओरडु लागले. तेथे जवळ - जवळ घरे असल्याने शेजारी काठ्या घेऊनच जमले. तेवढ्यात बिबट्यांनी धुम ठोकली; पण पुढे सगळा गाव जागा राहिला.
फोटो-------
विठ्ठल पाटणकर यांनी रात्री बिबट्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला.