शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीतील चौकात हजारो युवक जमल्याने तणाव

By admin | Updated: May 6, 2016 01:06 IST

अफवेचा परिणाम : शॉपिंग सेंटर, लक्ष्मी मार्केट परिसरातील दुकाने बंद; आमदार हाळवणकर तसेच पोलिसांच्या आवाहनानंतर वातावरण निवळले

इचलकरंजी : आगामी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुरुवारी सकाळपासून जवाहरनगरमधून संचलनास सुरुवात केली. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी लावलेले डिजिटल फलक पोलिसांकडून हटविले जाणार असल्याची अफवा पसरल्याने जनता चौकामध्ये शेकडो युवक जमा झाले. जमाव अचानकपणे जमू लागल्यामुळे शॉपिंग सेंटर, शिवाजी उद्यान, लक्ष्मी मार्केट, मराठा मंडळ परिसरातील दुकाने बंद झाली. मात्र, आमदार सुरेश हाळवणकर व पोलिसांनी तेथे येऊन पोलिसांकडून फलक हटविले जाणार नसल्याचे स्पष्ट केल्याने तणाव निवळला.शहर व परिसरामध्ये रविवारी (दि. ८) होणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर हजारोंच्या संख्येने डिजिटल फलक उभारले आहेत. काही डिजिटल फलकांवर आक्षेपार्ह मजकूर असल्याच्या आणि गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्तींची छायाचित्रे झळकत असल्याच्या तक्रारी होत्या. त्याचबरोबर वाहतुकीस अडथळा होईल, अशा रीतीने, तसेच दुकाने झाकोळली जातील अशा प्रकारे फलक उभारल्याने दुकानदार-व्यावसायिक त्रस्त झाले होते. दरम्यान, बुधवारी रात्री उशिरापर्यंत जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक यांच्यासह मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, आदींची बैठक झाली. सुमारे दोन तास झालेल्या बैठकीतील तपशील बाहेर समजू शकला नाही. मंगळवारी रात्री नगरपालिकेमध्ये झालेल्या पदाधिकारी, प्रशासन व पोलिस यांच्या बैठकीमध्ये १५ मे नंतर मंडळांना व संबंधित व्यक्तींना फलक हटविण्याचे आवाहन करण्याचे ठरले.शहरातील काही डिजिटल फलक उतरून घेण्यात आल्याचे वृत्त शहरभर पसरले असतानाच गुरुवारी सकाळपासून पोलिसांनी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे यांच्या नेतृत्वाखाली जवाहरनगरमधून संचलन केले. त्यात दंगल नियंत्रण कृती दलाच्या पथकानेही भाग घेतला. संचलन सुरू असतानाच विविध ठिकाणचे डिजिटल फलक पोलिस यंत्रणेकडून हटविणार असल्याचे मेसेज मोबाईलवरून फिरू लागल्यामुळे युवक चौकात जमू लागले. ही संख्या हजारोंच्या घरात गेल्याने तणाव निर्माण झाला. परिसरामधील सर्व दुकाने बंद झाली. बॅँकांनीही शटर खाली ओढले. ही माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेत स्पिकरवरून जमावाला शांत राहण्यास सांगितले.