शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीत ‘तणाव’, स्वाभिमानीत ‘संभ्रम’

By admin | Updated: September 18, 2014 00:19 IST

बंडखोरीशिवाय पर्याय नाही.

राम मगदूम - गडहिंग्लज -चंदगड मतदारसंघ आघाडीतील राष्ट्रवादीच्या वाट्याला असून, महायुतीमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या ठिकाणी दावा केला आहे. ‘राष्ट्रवादी’तर्फे विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर यांची, तर ‘स्वाभिमानी’तर्फे राजेंद्र गड्यान्नावर यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. मात्र, आघाडीतील काँगे्रसतर्फे माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, संभाजीराव देसाई-शिरोलीकर व विद्याधर गुरबे यांनीही तयारी केली असून, ‘राष्ट्रवादी’च्या उमेदवारीवर संग्राम कुपेकर यांनी, तर ‘स्वाभिमानी’च्या उमेदवारीवर नितीन पाटील यांनी आपला हक्क सांगत जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांसमोर बंडखोरीचे आव्हान असून, राष्ट्रवादीत ‘तणाव’, तर स्वाभिमानीमध्ये ‘संभ्रम’ आहे.स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या पश्चात झालेल्या पोटनिवडणुकीपासूनच त्यांचे पुतणे संग्राम कुपेकर यांनी उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. दरम्यानच्या काळात स्व. कुपेकरांची कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांनीच निवडणूक लढवावी, असाही मतप्रवाह होता. मात्र, उमेदवारीला कधीही दुजारो दिलेला नसतानाही या निवडणुकीत मायलेकी दोघींनी उमेदवारीसाठी ‘मुलाखत’ देऊन पक्षाने जबाबदारी दिल्यास ‘पेलण्याची’ तयारी दाखविली. त्यामुळे संग्रामसमोर बंडखोरीशिवाय पर्याय नाही.दीड वर्षापूर्वीच झालेल्या पोटनिवडणुकीत संध्यादेवींच्या विरोधात काट्याची टक्कर दिलेल्या गड्यान्नावर यांचाही आत्मविश्वास दुणावला असून, तेही जिंकण्याच्या इराद्यानेच कामाला लागले. गतवेळच्या निवडणुकीत ‘गडहिंग्लज’च्या तुलनेत ‘चंदगड’मधून गड्यान्नावर यांना मिळालेल्या मताधिक्यांमुळे नितीन पाटीलही उमेदवारीसाठी आक्रमक झाले आहेत. मात्र, संघटना बांधणी व खासदार शेट्टी यांच्याशी निकटचे संबंध लक्षात घेता गड्यान्नावर यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. त्यामुळेच नितीन पाटील यांना बंडखोरीशिवाय पर्याय नाही.निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेल्या ‘जनसुराज्य शक्ती’ तर्फे अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांची कन्या प्रा. स्वाती कोरी व संग्राम कुपेकर यांची नावे चर्चेत आहेत. त्यांनी कोरे यांची भेट घेतल्याने रंगत येणार आहे.