शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

‘अतिक्रमणा’वरून तणाव

By admin | Updated: April 21, 2016 00:36 IST

जयसिंगपूर पालिकेची कारवाई : शिवाजी सोसायटीतील अतिक्रमणे पाडली

जयसिंगपूर : आम आदमी पार्टीच्या बेमुदत उपोषणाची दखल घेत जयसिंगपूर नगरपालिका प्रशासनाने शहरातील सार्वजनिक मिळकतीवर केलेल्या अतिक्रमणावर कारवाईची मोहीम राबविली़ तीन ठिकाणचे अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले़ शिवाजी हौसिंग सोसायटीमधील कारवाईवेळी प्रशासनाला येथील नागरिकांनी विरोध दर्शविला़ मुख्याधिकारी हेमंत निकम व नागरिकांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली़ त्यामुळे काही काळ तणावपूर्णवातावरण निर्माण झाले होते़ अखेर प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमणे काढली.शहरातील नगररचना आराखड्यातील रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यासाठी आम आदमी पार्टीच्यावतीने येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर २७ मार्च ते १ एप्रिलअखेर धरणे आंदोलन झाले होते़ त्यावेळी पालिका प्रशासनाकडून कारवाईचे पत्र दिले होते़ मात्र, कारवाई न झाल्याने पुन्हा आम आदमी पार्टीच्यावतीने उपोषण सुरु केले़ बुधवारी उपोषणाचा तिसरा दिवस होता़ दरम्यान, उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घ्यावे, अशी प्रशासनाकडून विनंती केली़ मात्र, आंदोलनकर्त्यांनी जोपर्यंत अतिक्रमण काढण्याची कारवाई होत नाही़ तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा घेतला़ दरम्यान, नगरपालिकेने उपोषणाची दखल घेऊन उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला बुधवारी सकाळी अकरा वाजता सुरुवात केली़ शिवाजी हौसिंग सोसायटीमधील शुभांगी मगदूम यांच्या इमारतीचा आरसीसी जिना जेसीबीच्या साहाय्याने काढला़ त्यानंतर शरद पाटील यांचे दोन कंपौंड पाडण्यात आले़ शिवाजी हौसिंग सोसायटीतील अतिक्रमणाबाबत न्यायालयाची मनाई असल्याने तुम्हाला अतिक्रमणाची कारवाई करता येणार नाही, असा पवित्रा डॉ़ पाटील यांनी घेतला़ अतिक्रमणधारक व पालिका पथकांनी थेट पोलिस ठाणे गाठले़ यावेळी पोलिस ठाण्यात सपोनि संतोष डोके यांच्यासमोर दोन्हीकडील वकिलांनी बाजू मांडली़ यातून कोणताच मार्ग न निघाल्याने सरकारी वकिलांचे मत घेतल्यानंतर नगरपालिकेला कोणत्याही प्रकारचा अडथळा आणू नये, तर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक मिळकतीवर अतिक्रमण काढण्याचा नगरपालिकेला अधिकार आहे़ यानुसार दुपारी चारच्या सुमारास बी.़ एस़ पाटील यांच्या घरालगत असणारे अतिक्रमण पथकाकडून जमीनदोस्त केली. (प्रतिनिधी)शाब्दिक खडाजंगी बुधवारी सकाळी अकरा वाजता लक्ष्मी नारायण मालू हायस्कूलच्या प्रवेशव्दारासमोरील डॉ़ बी़ एस़ पाटील यांच्या घरालगत असणाऱ्या वाहन पार्किंगच्या भिंती पाडण्यासाठी पथक दाखल झाले. अतिक्रमण काढताना जेसीबीला रोखण्याचा प्रयत्न झाल्याने तणाव निर्माण झाला़ मुख्याधिकारी हेमंत निकम व विरोध दर्शविणाऱ्यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली़अतिक्रमणे काढणारनगरपालिकेच्या हद्दीतील व शिवाजी हौसिंग सोसायटीमधील (गट नं़१७३२/४) शीलप्रभा पाटील, विद्या कुरडे, बापूसाहेब चौगुले, देवेंद्र माणगावे, आण्णासो पाटील, बी़ एस़ पाटील यांनी सार्वजनिक मिळकतीवर अतिक्रमण केल्याचे नगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता राजेंद्र गवळी यांनी सांगितले़ ही अतिक्रमणेदेखील काढण्यात येणार आहेत़ मुख्याधिकारी निकम यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली़