शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ऊस उत्पादनात एकरी दहा टनांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:31 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ऊस दराची कोंडी फुटून साखर कारखान्यांचा हंगाम वेळेत सुरू झाला असला, ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ऊस दराची कोंडी फुटून साखर कारखान्यांचा हंगाम वेळेत सुरू झाला असला, तरी उसाच्या उत्पादनात झालेल्या घटीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकरी दहा टनांचे उत्पादन कमी झाले असून, राज्याच्या उत्पादनातही यंदा ५० लाख टनांची घट होईल, असे चित्र आहे.उसाच्या एफआरपीमध्ये वाढ झाल्याने यंदा उसाचे क्षेत्र सगळीकडेच वाढले होते. त्यामुळे यंदा राज्यात उसाचे जास्त पीक होऊन अतिरिक्त साखर होईल, असाच तज्ज्ञांचा अंदाज होता; पण जून ते आॅगस्ट या कालावधीत झालेल्या एकसारख्या पावसाने उसाची वाढ खुंटली. सप्टेंबर महिन्यात पावसाने एकदमच दडी मारल्याने पाण्याअभावी ऊस करपू लागले आणि किडीला पोषक असेच वातावरण राहिल्याने करप्याने ऊस खाली बसविला. परिणामी उत्पादन घटणार हे निश्चित होते; मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यात घट होईल, याचा अंदाज नव्हता.ऊस दराची कोंडी फुटून साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन १0 दिवस झाले. सगळ्याच कारखान्यांची तोडणी यंत्रणा गतिमान झाली असून, सुरुवातीला आडसाल लावणीची तोड प्राधान्याने सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केल्यास आडसाल लावणीच्या उसाला सरासरी एकरी ६० टनांचा उतारा पडणे अपेक्षित आहे; मात्र यंदा त्यामध्ये १0 टनांची घट झाल्याचे चित्र आहे. सध्या एकरी ४५ ते ५० टनांपर्यंतच उतारा मिळत असल्याने शेतकऱ्यांबरोबरच साखर कारखानदारांची चिंता वाढलीआहे. गेल्यावर्षी राज्यात सुमारे ९४० लाख टन उसाचे गाळप झाले होते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर विभागात थोडा फटका बसेल; पण उर्वरित राज्यात दुष्काळाचा मोठा फटका बसणार आहे; त्यामुळे राज्याचे एकूण उत्पादन गतवर्षीच्या तुलनेत किमान ५० लाख टनांनी कमी होईल, असा अंदाज आहे.आतापर्यंत राज्यातील १३० हून अधिक साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत. त्यांचे १६ नोव्हेंबरपर्यंत ८२ लाख ४० हजार टन गाळप होऊन ७४ लाख ९६ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ९.१० टक्के आहे.गाळप व उताºयात ‘पुणे’ पुढेराज्याच्या एकूण गाळपाचे चित्र पाहिले, तर पुणे विभागाने आघाडी घेतली आहे. या विभागातील ४९ खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी ४२.९३ लाख टनांचे गाळप करीत ९.२८ टक्के साखर उतारा राखला आहे.