शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

चंदुरात दहा सुपरस्प्रेडर पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:25 IST

इचलकरंजी : चंदूर (ता. हातकणंगले) येथील ३१० सुपरस्प्रेडर नागरिकांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये दहाजण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे खळबळ ...

इचलकरंजी : चंदूर (ता. हातकणंगले) येथील ३१० सुपरस्प्रेडर नागरिकांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये दहाजण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. गावामध्ये समूह संसर्गाची शक्यता धरून ग्रामपंचायत, ग्राम समिती व आरोग्य विभाग यांच्यामार्फत संबंधितांना उपचारासाठी दाखल करणे, तसेच त्यांचे संपर्क शोधणे, औषध फवारणी व उपाययोजना करणे, या बाबींकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

चंदूर येथील मेडिकल, किराणा दुकानदार, पान शॉप, भाजीविक्रेते, अशा ३१० सुपरस्प्रेडर नागरिकांची कोविड आरटीपीसीआर तपासणी व दोघांची अ‍ॅँटिजन तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल मंगळवार व बुधवारी या दोन दिवसांत प्राप्त झाला. त्यामध्ये कापड दुकानदार महिला, किराणा दुकानदार, हॉटेलचालक, पतसंस्था कर्मचारी, भाजीविक्रेता, दूध डेअरी कर्मचारी, शाहूनगर परिसरातील तीन मासेविक्रेते आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर अन्य तपासणीतील बुधवारी तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. असे एकूण आजतागायत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११५ वर पोहोचली आहे. त्यातील आजपर्यंत एकूण सातजणांचा मृत्यू झाला आहे, तर ७४ जण बरे झाले आहेत.

गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत ही तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. या शिबिरासाठी पं. स. सदस्य महेश पाटील, सरपंच अनिता माने, प्राथमिक आरोग्य केंद्र, पट्टणकोडोलीचे वैद्यकीय अधिकारी डी. एस. बोरगावे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. समीना हिरोली, वैज्ञानिक अधिकारी रेश्मा शिकलगार, आर. ए. तराळ, आरोग्य सेवक संजय पाटील, आरोग्यसेविका दीपाली कुंभार, तलाठी सीमा धोत्रे, पोलीसपाटील राहुल वाघमोडे, डाटा ऑपरेटर यशवंत पाटील, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी तसेच उपकेंद्र, चंदूर येथील सर्व आशा सेविकांचे सहकार्य लाभले.