शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

शिक्षक मान्यतेसाठी दहा लाखांचा दर

By admin | Updated: January 15, 2016 00:43 IST

‘माध्यमिक’चा भ्रष्टाचार : मिरची, शेंगा अन् साखरेची लाच; खाबुगिरी शिरजोर

भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर-संस्थेने घेतलेल्या शिक्षकास मान्यता देण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागातील काही भ्रष्ट कारभाऱ्यांनी दहा लाखाचा दर काढला आहे. संबंधित टेबलच्या लिपिकांपासून अधीक्षक, अधिकारी (अपवाद वगळून) यांना ‘वाटा’ मिळाल्यानंतर शिक्षक मान्यता मिळते. रोस्टर डावलून शिक्षक मान्यतेचा प्रस्ताव असल्यास त्यामध्ये पुन्हा वाढ होते. काही खाबुगिरीतील सराईत ‘महाभाग’ संबंधितांकडून मिरची, साखर, भुईमूगाच्या शेंगा लाच म्हणून स्वीकारतात. खाबुगिरी शिरजोर आणि ‘वचक आणि दरारा कमजोर’ अशी अवस्था विभागाची झाली आहे.स्वयंअर्थसहाय्यांतर्गत नवीन माध्यमिक शाळांना परवानगी देणे, शाळा मान्यतेसाठी प्रथम मान्यता देणे, अशासकीय खासगी माध्यमिक शाळांमध्ये रिक्त झालेल्या पदांवर भरती करण्यासाठी परवानगी देणे, शंभर टक्के अनुदानित शाळांना वेतनेतर अनुदान देणे, इमारतीसाठी भाडे देणे, पाचवी ते आठवीचे वर्ग असलेल्या शाळांची दर तीन वर्षांनी पडताळणी करून मान्यता देणे, माध्यमिक शाळांची तपासणी करणे, विनाअनुदानित शाळा, तुकड्या, वर्ग अनुदानावर आणणे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एक लाखांपर्यंतच्या वैद्यकीय खर्चाना मान्यता देणे, जातीत, नावात, जन्मतारखेत बदल करण्यास कागदपत्रांची पडताळणी करून मान्यता देणे, सेवानिवृत्त प्रकरणांना मान्यता देणे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्यायप्रविष्ट प्रकरणात अहवाल सादर करणे, न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे, ज्या माध्यमिक शाळांचे अंतर्गत वाद विकोपाला गेले आहेत, शैक्षणिक दर्जा खालावला आहे, अशा शाळांवर प्रशासक नियुक्त करणे, मान्यता काढून घेणे, अनधिकृत शाळांवर कारवाई करणे, सेमी इंग्रजी वर्गांना मान्यता देणे, अतिरिक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करणे, वाढीव पदांना मान्यता, थकीत वेतनेतर अनुदान देणे, अल्पसंख्याक शाळांना प्रोत्साहन देणे, आदी महत्त्वाची कामे माध्यमिक विभागातर्फे चालतात. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील बहुतांशी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कारवाईपेक्षा मलई गोळा करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यातच ते धन्यता मानत असल्यामुळे बेकायदा कामांना ऊत आला आहे.शिक्षण सेवकाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सेवा कायम करणे, शाळांना परवानगी देणे, शिक्षक मान्यता देणे, वेतनेतर अनुदान, बदली, बढती, वेतनश्रेणी लागू करणे, वैद्यकीय बिल मंजूर करणे, न्यायालयीन प्रकरणात अहवाल देणे ही कामे म्हणजे चिरीमिरीचे त्यांचे कुरणच आहे. संस्था दहा ते २० लाखांपर्यंत डोनेशन घेऊन शिक्षकांची नेमणूक करतात. त्या नेमणुकीला मान्यता मिळाल्याशिवाय पगार सुरू होत नाही. मान्यतेसाठी प्रस्ताव आल्यानंतर संबंधित टेबलवरील लिपिक पहिल्यांदा प्रस्ताव नाकारण्यासाठी ‘क्युरी’चा शोध घेतो.तो नाकारतो. त्यामुळे नाईलाजास्तव तो उमेदवार काम करून घेण्यासाठी ‘अर्थपूर्ण’ वाटाघाटी करतो. लाचेची रक्कम ठरल्यानंतर क्युरी काढलेला लिपिकच, अधिकाऱ्यांपर्यंत प्रस्ताव नेऊन मान्यता घेतो. मंजूर झालेल्या वैद्यकीय बिलातील टक्केवारी घेतली जाते. बोलावतात एका ठिकाणी अन्लाच स्वीकारतात तिसऱ्याच ठिकाणी...रक्कम स्वीकारण्याची प्रत्येकाची ‘आयडिया’ वेगवेगळी आहे. जिल्हा परिषदेचे आवार, बसस्थानक, बिंदू चौक या ठिकाणचे हॉटेल लाच स्वीकारण्याचे अड्डे आहेत. साखर, मिरची, शेंगा, आदी वस्तू आणि पैसे स्वीकारण्यासाठी बोलावितात एका ठिकाणी आणि घेतात तिसऱ्याच ठिकाणी. तक्रार केल्यास लाचलुचपत विभागाच्या सापळ्याला चकवा देण्यासाठी ही शक्कल लढविली जाते.