शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दहा आयसीयू बेडचे नियोजन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:19 IST

यड्राव : शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील सर्व कामगार कुटुंबांच्या आरोग्याचे प्रश्न मार्गी लागावेत, तसेच त्यांना त्वरित व मोफत उपचार ...

यड्राव : शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील सर्व कामगार कुटुंबांच्या आरोग्याचे प्रश्न मार्गी लागावेत, तसेच त्यांना त्वरित व मोफत उपचार व्हावेत या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत या आरोग्य केंद्राची उभारणी केली आहे. भविष्यात येथे दहा आयसीयू बेड व दहा जनरल बेडची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून, परिसरातील पंधरा हजारांहून अधिक कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना याचा लाभ मिळणार आहे, असे प्रतिपादन आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.

यड्राव (ता. शिरोळ) येथील पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये उभारण्यात आलेल्या कामगार विमा दवाखान्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी विज्ञानंद मुंडे, संजय पाटील-यड्रावकर प्रमुख उपस्थित होते.

मंत्री यड्रावकर म्हणाले की, कामगार कुटुंबांना आरोग्य सेवा-सुविधा मिळवून देण्याच्या उद्देशाने आग्रही राहून ही सुविधा सुरू केली आहे. या दवाखान्यास इचलकरंजी परिसरातील अद्यावत सुविधा असलेल्या दवाखाने संलग्न करण्यात आले आहेत. त्यामुळे उपचारही अत्यल्प दरात, मोफत होतील. त्याचबरोबर आजारी रजा, मॅटर्निटी रजा, अपघात उपचार अशा अनेक सुविधा या अंतर्गत मिळणार आहेत. केंद्राच्या सुविधा कामगारांच्या घरापर्यंत कशा पोहोचतील यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करीत आहोत.

या वेळी शामराव कुलकर्णी, तुषार सुलतानपुरे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी वसाहतीचे उपाध्यक्ष महावीर खवाटे, अनिल बागणे, आदित्य पाटील-यड्रावकर, सत्येंद्रराजे नाईक-निंबाळकर, अशोकराव माने, सुरेश रेडेकर, सरपंच कुणालसिंह नाईक-निंबाळकर, उपसरपंच प्राची हिंगे, राहुल खंजिरे, ताज्जोद्दिन तहसीलदार, प्रतीक चौगुले, अभिजित पाटील उपस्थित होते.

फोटो - ३१०५२०२१-जेएवाय-०२

फोटो ओळ - यड्राव (ता. शिरोळ) येथे पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये आरोग्य केंद्राचे उद्घाटन आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याहस्ते झाले. यावेळी विद्यानंद मुंडे, संजय पाटील-यड्रावकर, अशोकराव माने, सत्येंद्रराजे नाईक-निंबाळकर, प्रकाश अकिवाटे, कुणालसिंह नाईक-निंबाळकर, प्राची हिंगे उपस्थित होते.